With the onset of winter, Sinnarkars thronged the plains for a morning walk esakal
नाशिक

Nashik News : हिवाळ्याची चाहूल अन् सिन्नरकरांची मैदानावर गर्दी!

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : पावसाळा संपताच वातावरणामध्ये गारठा जाणवू लागला आहे. यातच हिवाळ्याची सुरवात झाल्याने हे वातावरण शरीराला चांगले असल्याने सिन्नरकरांची व्यायामासाठी मैदानावर गर्दी वाढू लागली आहे. दररोज मॉर्निंग वॉक करणाऱ्याच्या संख्येत वाढ झाली असून यात लहानांपासून ज्येष्ठ यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (morning walk crowd on ground at sinnar Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

वातावरणात थंडीची चाहूल लागल्याने सिन्नरमधील तरुणांसह वृद्धांपर्यंत सर्वच पहाटेच्या मंद गारव्यात शारीरिक कसरती करण्यासाठी मैदानावर गर्दी करु लागले आहे. यात महिलांचा देखील सहभाग मोठा आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह महामार्गावर पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. चांगल्या आरोग्यासाठी सिन्नरकर सजग असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. मैदानावर शारीरिक हालचालीसह इतर व्यायामाला नागरिक प्राधान्य देत आहे.

सकाळची शुद्ध हवा फायदेशीर

"वयोमानानुसार आरोग्याला हितकारक असाच व्यायामाचा प्रकार निवडावा. दमवणारे किंवा बागेत फेरफटका मारणारे असे चालणे नसावे. शरीराला झेपेल असे चालावे. नियमित चालण्याच्या व्यायामामुळे आरोग्य निरोगी ठेवता येते. शिवाय हाडे मजबूत होतात. वजन कमी होते. चालण्याची सवय नसलेल्यांनी सुरवातीला कमी अंतर चालावे. हळूहळू हे अंतर वाढवावे. कोणताही व्यायाम हा हळूहळू करावा. चालणे हे उत्तम आरोग्यदायक असते. पहाटेच्या शुद्ध हवेने शरीर तंदुरुस्त राहते." - डॉ. सुदर्शन हेकरे, सिन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT