MSEDCL cut off the power supply to Dikshi Gram Panchayat street light esakal
नाशिक

महावितरणचा अजब कारभार! लाखोंचे घेणे, तरीही तोडली वीज

उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : दिक्षी (ता. निफाड) येथे महावितरण कंपनीचे ग्रामपंचायत हद्दीत ३२ किलोवॉटचे उपकेंद्र कार्यान्वित असून त्याची ग्रामपंचायतीने केलेली करआकारणी वार्षिक १ लाख ३८ हजार रूपये इतकी आहे. ती महावितरणने १६ लाख २१ हजार ४९२ इतपर्यत थकविली आहे. ग्रामपंचायतीचे एवढे घेणे असतानाच महावितरणने मात्र ग्रामपंचायतीच्या पथदीपांची वीज खंडीत करत ग्रामस्थांना मोठा धक्का दिला आहे.

सात दिवसात रक्कम न मिळाल्यास उपकेंद्रास कुलूप लावून उपकेंद्राचे कामकाज बंद करण्याचा ठराव ग्रामपंचातीने मंजूर केला आहे. त्याबाबत सहायक उपअभियंत्यास सूचित करून इशारा दिला आहे. महावितरणचे उपकेंद्र दिक्षी येथे होऊन बारा वर्ष झाली आहेत. तेव्हापासून ग्रामपंचायतीला एकूण रुपये १३८०००+३४५०८+ १७२५०८ इतकी रक्कम वेळोवेळी अदा केलेली आहे. तेव्हापासून विजवितरणकडे एकूण रक्कम रुपये १६ लाख ५६ हजार रूपये इतकी येणे बाकी होती. त्या रक्कमेपैकी ग्रामपंचायतीला १ लाख ७२ हजार ५०८ रूपये अदा केले आहेत. आजपर्यत १४ लाख ८३ हजार ४९२ रूपये व चालू १ लाख ३८ हजार रूपये अशी एकूण १६ लाख २१ हजार ४९२ इतकी रक्कम येणे आहे. ही रक्कम त्वरित ग्रामपंचायतीला अदा करावी तसेच पोल व डीपीचे वार्षिक येणे दोन लाख ५० हजार रूपये इतके येणे बाकी आहे. ही रक्कम त्वरित भरावी अन्यथा ग्रामपंचायत पुढील कारवाई करेल याची नोंद घ्यावी. ग्रामपंचायतीचे येणे बाकी असतानाही गावातील पथदीपांचे कनेक्शन बंद केले आहे. ही थकबाकी सात दिवसात भरणा करावी अन्यथा ग्रामपंचायत व ग्रामस्थ दिक्षी उपकेंद्रास कुलूप लावून कामकाज बंद करतील असा ठराव ग्रामपंचायतीने सोमवारी (ता.२५) केला.


''दिक्षी ग्रामपंचायती उपकेंद्राच्या करआकारणीच्या थकीत असलेल्या रकमेबाबत ग्रामपंचायतीने नुकतेच बिल आमच्या कार्यालयाला दिले आहे. पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठविलेले आहे. लवकरच थकीत कर आकारणी अदा करण्यात येईल.'' - योगेश्वर पाटील, कार्यकारी अभियंता, वीज वितरण, ओझर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT