A senior citizen pushing a damaged bus esakal
नाशिक

Nashik: चल यार..बसला धक्का मार! पिंपळगाव आगारातील बसेस खिळखिळ्या, ज्येष्ठ नागरिकांवर धक्का देण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पिंपळगाव आगरातील परिवहन महामंडळाच्या अनेक बस अक्षरश: खिळखिळ्या झाल्या आहेत. बहुतांश बसची वयोमर्यादा संपल्याने कधीही बिघाड होऊन रस्त्यातच बंद पडतात.

इंजिन जुने झाल्याने ते कधीही धोका देत आहे. काही बसचे टायर कालबाह्य झाली असून, बस पंक्चर झाल्यावर एसटीतील प्रवाशांना तासन्‌तास ताटकळ बसावे लागते. दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव आगरातील एका बसची बॅटरी निकामी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना धक्का देण्याची वेळ आली.

‘चल यार... बसला धक्का मार’, असे म्हणत मोफत प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांचा बसने चांगलाच घाम काढला. पिंपळगांव आगराला नव्या बसची प्रतिक्षा आहे. (MSRTC Buses in Pimpalgaon Agar jammed time to push senior citizens Nashik)

पिंपळगाव आगरात आलेल्या प्रत्येक आगार व्यवस्थापकाने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण कारभार सुधारला नाही. यातही दुष्काळात तेरावा महिना म्हणजे अचानक होणाऱ्या बिघाडामुळे होणारा त्रास ही सर्वांत मोठी समस्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

असाच बाका प्रसंग पिंपळगाव आगराच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर ओढविला. स्थानकातून बस खेडेगावाकडे निघाली. अचानक बॅटरी निकामी झाले. त्यामुळे बस रस्त्यातच बंद पडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अखेर बसमधील ज्येष्ठ नागरिकांना बसला धक्का देत सुरू करावी लागली. असे प्रसंग वारंवार घडत आहेत. टायर पंक्चर झाले, तर ते बदलण्यासाठी जॅक, पर्यायी टायर उपलब्ध नसते. त्यानंतर अन्य व्यवस्था होण्यासाठी अर्थातासापेक्षा अधिक कालावधी लागतो.

दरम्यानच्या काळात प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. यामुळे पुढील बस फेऱ्यांचा खोळंबा होत आहे. बसमधील प्रवास सुसाट होण्यासाठी पिंपळगाव आगराला नव्या बसची आवश्‍यकता आहे. पिंपळगाव आगरातील ६२ बसपैकी निम्याहून अधिक बस कालबाह्य झाल्या आहेत.

"ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी महामंडळाकडून प्रवासासाठी सवलती दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात बसेसची दुरवस्था असल्याचे विरोधी चित्र आहे. शहरी आगरांना नव्या बस दिल्या जातात. मात्र, ग्रामीण भागात सर्वांधीक उत्पन्न देणाऱ्या पिंपळगाव आगरावर अन्याय होत आहे. याबाबत परिवहन मंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी करणार आहे."

-भास्करराव बनकर, माजी संचालक, परिवहन महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT