Ukraine Evacuated Student esakal
नाशिक

युक्रेनहून परलेल्‍या विद्यार्थ्यांचे MUHS कडून माहिती संकलन

अरुण मलाणी

नाशिक : युद्धग्रस्त युक्रेनमधून परतणाऱ्या वैद्यकीय विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची प्राथमिक माहिती संकलित करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (MUHS) सुरवात झाली आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.माधुरी कानिटकर यांनी माहिती दिली आहे.

या संकेतस्थळावर आहे अर्ज

कुलगुरू डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या, की आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या मनोगतात युक्रेनहून परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीत मदतीचा उल्‍लेख केला होता. या साठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले होते. या दृष्टीने विद्यापीठातर्फे www.muhs.ac.in या संकेतस्थळावर अर्ज दिलेला आहे. या अर्जाद्वारे विद्यार्थ्यांनी योग्य माहिती भरून पाठवायची आहे.

देशातील सर्व वैद्यकीय विद्याशाखांचे प्रवेश ‘नीट’ प्रवेश पद्धतीद्वारे गुणवत्ता आधारित होत असल्याने युद्धग्रस्त युक्रेनमधील विद्यार्थ्यांना येथील महाविद्यालयात सरळ प्रवेश देता येणे शक्य नाही. मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले असल्याने त्यांची आकांक्षा लक्षात घेत त्यांच्या तेथील शिक्षणाबाबत विश्वासार्ह मूल्यांकन परीक्षा आयोजित करता येणे अशा सर्व बाबींचा विचार करण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या देशांतर्गत आरोग्य शिक्षणाच्या दर्जासाठी कोणतीही मानके कमी केली जाणार नाहीत. मात्र यात सर्वच भागधारकांच्या सूचना, निर्देश यांचा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.
कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्‍हणाले, की विद्यार्थ्यांनी त्यांचे वैयक्तीक व शैक्षणिक तपशील भरून ते ई-मेलव्दारे eligibility@muhs.ac.in या ई-मेलवर पीडीएफ स्वरूपात द्यावी.

NMCकडून मागविले मार्गदर्शन

नॅशनल मेडिकल कमिशनकडे (NMC) या विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित करण्यासंदर्भात काही योजना आहे का, यासंदर्भात चाचपणी विद्यापीठामार्फत केली जाते आहे. याबाबत सुस्पष्टता व निर्देश प्राप्त झाल्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचेही कुलगुरू डॉ.कानिटकर यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT