corona  sakal
नाशिक

नाशिक : मनपा रुग्णालय कर्मचारी कोरोना विळख्यात

वैद्यकीय विभागाचे कानावर हात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या बावीस महिन्यांपासून कोरोना रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या महापालिका रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांना (Municipal hospital staff) कोरोनाने घेरल्याने त्याचा (Corona positive) परिणाम रुग्ण सेवेवर होताना दिसत आहे. परंतु, वैद्यकीय विभागाकडून या विषयावर कानावर हात ठेवले आहे.

कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय ही महापालिकेची चार मोठी रुग्णालये आहेत. गेल्या बावीस महिन्यांपासून अपूर्ण मनुष्यबळात येथील कर्मचारी कोरोना रुग्णांना सेवा देत आहे. एका कर्मचाऱ्यावर दोन ते तीन जणांचा कार्यभार असताना महापालिकेकडून भरती होत नाही. या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालयातील कर्मचारी सेवा देत आहेत. परंतु, कोरोना तिसऱ्या लाटेमध्ये रुग्ण संख्या दोन हजारांच्या पुढे गेली असताना त्यात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरले आहे. त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे.

प्रत्येक रुग्णालयात पंधरा ते वीस कर्मचारी कोरोनाबाधित आहे. वैद्यकीय विभागाने मात्र या विषयावर कानावर हात ठेवले आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या ३४८ रिक्तपदे भरण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकशास्त्र तज्ञ, शल्यचिकित्सक, स्रीरोगतज्ज्ञ, क्ष- किरणतज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, हेडनर्स, स्टाफनर्स, एएनएम, मिश्रक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वॉर्डबॉय आदी रिक्तपदे भरण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर नेमका कसा फुटला? भिवंडीत काय घडलं? परीक्षा अचानक रद्द; राज्य परीक्षा परिषदेचं पत्र आलं समोर

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Latest Marathi News Live Update : शिक्षकांच्या TET परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळी विरोधात भिवंडीत कारवाई

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT