marathi sahitya sammelan
marathi sahitya sammelan esakal
नाशिक

सूर, काव्य सुमधुर गीतांनी सजली संमेलनाची पूर्वसंध्या | Nashik

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : धुक्याची अलवार चादर, हवेतील गुलाबी गारवा, रंगीबेरंगी कुसुमांनी सजलेल्या कुसुमाग्रज नगरीत काव्य, सूर आणि संगीत संध्येच्या मंतरलेल्या वातावरणात 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या चिरस्मरणिय झाली.

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरी (भुजबळ नॉलेज सिटी) मध्ये होत असलेल्या 94 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला 'गायक, संगीतकार, दिग्दर्शक सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांनी सादर केलेली 'माझे जिवीची आवडी' ही काव्य, गीत, संगीताने सजलेली मैफल रंगली.
मैफलीत संत रचनांपासून, स्वातंत्र्यवीर सावरकर, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, आरती प्रभू, कवी ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, वसंत बापट यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अजरामर झालेल्या कविता गीत सादर झाले.
गायक हृषिकेश रानडे, विभावरी आपटे, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
रिमझिम पावसातही रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमास स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ, मा खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT