malegaon city 1.png
malegaon city 1.png 
नाशिक

"कोरोना होणार नसल्याची लेखी हमी दिली, तरच लस घेऊ!" मालेगावात मुस्लिम बांधवांचा लसीकरणाला नकार?

गोकुळ खैरनार

मालेगाव (जि.नाशिक) : जिल्ह्यासह देशभरात कोरोना लसीकरणाची धूम सुरू असतानाच लसीसंदर्भात येथील मुस्लिम समाजात अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची लेखी हमी द्या, तरच लस घेऊ’ अशी अजब मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे केली जात आहे.

मुस्लिम बांधव लसीकरणास नकार?

शहरात १७ दिवसांत दोन हजार ४५१ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले. यात मुस्लिम समाजातील ज्येष्ठांची संख्या दोन आकडीदेखील नाही. आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना या अजब मागणीसह मुस्लिम बांधव लसीकरणास नकार देत असल्याचे कळविले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मालेगावला कवेत घेण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या सुरवातीला गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळात शहरातील मुस्लिमबहुल पश्‍चिम भागातील रुग्णसंख्या मोठ्या संख्येने आढळली. यानंतर कोरोनाने आपला मोर्चा कॅम्प- संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागाकडे वळविला. जून २०२० ते आजतागायत या भागात रोज शेकडो रुग्ण आढळत आहेत. मध्यंतरीच्या सहा महिन्यांत पूर्व भागातून कोरोना हद्दपार झाला होता. मात्र अलीकडे या भागातून कमी प्रमाणात का होईना रुग्ण आढळत आहेत.

कोरोना होणार नाही, याची लेखी हमी दिली, तरच लस घेऊ 

१ मार्चपासून जिल्ह्यात ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरवात झाली. ७० टक्के लोकसंख्या असलेल्या पूर्व भागातून लसीकरण मोहिमेला ज्येष्ठांनी सुरवातीच्या १७ दिवसांत तरी धुडकावून लावले आहे. कोरोना व लसीसंदर्भात येथे अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लसीचा काहीही फायदा होत नाही. लस घेतल्यावर कोरोना होणार नाही, असे लिहून दिले, तर आम्ही घेऊ,’ असे खडे बोल येथील नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुनावले जात आहेत. 

पोलिओसारखीच परिस्थिती 
येथे कोरोना लसीकरणाबाबत पोलिओसारखीच परिस्थिती आहे. देशातून पोलिओचे उच्चाटन होण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने आजवर शेकडो पोलिओ लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या. आजवर एकदाही पोलिओचा डोस न घेतलेले येथे हजारावर कुटुंबातील किमान साडेतीन ते चार हजार बालके आहेत. धर्मगुरू व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार प्रबोधन करूनही मालेगावात पोलिओचे शंभर टक्के लसीकरण कधीच पूर्ण झाले नाही. पोलिओसारखीच परिस्थिती कोरोना लसीकरणाची होण्याची शक्यता आहे. कोरोना नियंत्रणात आणतानाच येथील लसीकरण मालेगावसह जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरणार आहे. 


मालेगावात आजवर झालेले लसीकरण असे : 
आरोग्य कर्मचारी- दोन हजार ७४ 
पोलिस, महसूल कर्मचारी- एक हजार ७८३ 
४५ वर्षांवरील गंभीर आजारी रुग्ण- ४१९ 
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक- दोन हजार ४५१ 


महापालिका हद्दीतील आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे प्रत्येकी दोन डोस पूर्ण होत आले आहेत. ४५ वर्षांवरील गंभीर आजारी रुग्णांनाही तातडीने लस दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. या भागातील ज्येष्ठांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे वरिष्ठांना कळविले आहे. 
- डॉ. सपना ठाकरे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT