IPL 2026 Auction Live Kartik Sharma for ₹14 Crore
esakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेसाठी यूएईमध्ये लिलाव सुरु आहे. या लिलावात अनकॅप्ट खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात येत आहे. चेन्नईने कार्तिक शर्मासाठी तब्बल १४ कोटी २० लाख रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतलं. कार्तिकसाठी सीएसके, कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली, मात्र, यात सीएसकेने बाजी मारली आहे. त्यानंतर आता कार्तिक शर्मा नेमका कोण? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात बघायला मिळते आहे.