Godavari river nashik esakal
नाशिक

Namami Goda Project: ‘नमामि गोदा’ प्रकल्प आराखडा ऑगस्टअखेर केंद्राला सादर होणार

सकाळ वृत्तसेवा

Namami Goda Project : आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह गोदावरी नदीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा सल्लागार संस्थेकडून आठ दिवसात सादर केला जाणार आहे.

त्यानंतर तातडीने ऑगस्टअखेर केंद्र सरकारकडे महापालिका आराखडा सादर करेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिली. (Namami Goda project plan will be submitted to Center by end of August nashik)

भाजप सत्ताकाळात ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाराणसी येथील गंगा नदीच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्याची मागणी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून केंद्रीय जलशक्ती विकास मंत्री शेखावत यांच्याकडे करण्यात आली होती.

प्रकल्प राबविण्यासाठी जवळपास १८०० कोटी रुपये निधी देण्याची तयारी केंद्र सरकारकडून दाखविण्यात आली. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

महापालिकेने त्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केली, मात्र सल्लागार संस्थेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात अडचणी निर्माण होत होत्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, ज्या संस्थेची सल्लागार संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्या संस्थेने येत्या आठ दिवसात प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे महापालिकेला कळविले आहे. त्यानंतर ऑगस्टअखेर केंद्र सरकारला प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे.

प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यास गोदावरी नदीवरील घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, मुख्य जलवाहिन्यांची दुरुस्ती व क्षमतावाढ करणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे नवीन मलनिस्सारण केंद्र उभारणे, नवीन रहिवासी क्षेत्रातील मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्रांकडे वळविणे आदी महत्त्वाची कामे केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीसाठी कशी असावी भारताची Playing XI? अश्विनने निवडला संघ

Thane News: सिद्धेश्वर तलाव परिसराचा कायापालट होणार! जागतिक दर्जाचा वॉटरफ्रंट प्रकल्प उभारणार; ठाण्याला नवे बिझनेस हब मिळणार

Live Marathi News Update : आपल्या विद्यार्थ्यांवर होणारा हा अत्याचार हा एक मूलभूत मुद्दा आहे - राहुल गांधी

आमचा सर्वात मोठा आशीर्वाद आला... अभिनेत्री करिश्मा तन्ना झाली आई, गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर दिला गोंडस मुलाला जन्म

Career Numerology : 'या' मुलांकाचे लोक पगारवाढ मिळवण्यात असतात भाग्यवान; नशीब देतं अपेक्षेपेक्षा खूप जास्त यश

SCROLL FOR NEXT