नाशिक

निफाड पक्षी सप्ताहाचा सांगता

CD
पान-१ ॲंकर-- फोटो देतो -------------- नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी सप्ताहाची दिमाखदार सांगता --------------- पक्षी गणना, गोदावरी परिक्रमा, सायकल रॅलीसह विविध उपक्रमांनी पर्यावरण संवर्धनाचा जागर सकाळ वृत्तसेवा निफाड, ता.१३ ः निसर्गाच्या कुशीत मुक्तपणे विहार करणारे पक्षी हे पर्यावरणाचे खरे वैभव असून, त्यांच्या किलबिलाटाने निसर्गसृष्टी अधिक समृद्ध होत असते. या पक्ष्यांचे संरक्षण, संवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात आयोजित पक्षी सप्ताहाची दिमाखदार सांगता झाली. पक्षी निरीक्षण, पक्षी गणना, गोदावरी परिक्रमा, सायकल रॅली, जनजागृती आणि पक्षिमित्रांचा सन्मान अशा विविध उपक्रमांनी हा सप्ताह संस्मरणीय ठरला. ------------- ५ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप ‘बर्डमॅन ऑफ इंडिया’ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीदिनी करण्यात आला. यानिमित्त पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही या उपक्रमातून व्यक्त झाला. उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनातून हा सप्ताह झाला. हिवाळ्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त होते. या पक्षीवैभवाची ओळख नागरिकांना व्हावी आणि त्यांच्या संवर्धनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग वाढावा, हा सप्ताहाचा मुख्य हेतू होता. १६-१ पक्षी गणनेतून जैवविविधतेचा वेध पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी गणना आणि निरीक्षणाचे उपक्रम राबविण्यात आले. पक्षी निरीक्षक, अभ्यासक आणि पक्षिमित्रांनी सहभाग घेत विविध पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांचे वास्तव्य, अधिवास आणि नैसर्गिक जीवनशैली यांची माहिती संकलित केली. पक्ष्यांच्या अस्तित्वाचा पर्यावरणीय समतोल राखण्यात असलेला महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित करण्यात आला. २०-२ चौकट रामकुंड ते नांदूरमध्यमेश्वर गोदावरी परिक्रमा पक्षी संवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी वन्यजीव विभाग नाशिक, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य, नेचर क्लब ऑफ नाशिक, पक्षिमित्र मंडळ नाशिक, अरण्यानी बायो कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वेटलँड एज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात आले. नाशिक येथील रामकुंड ते नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील चापडगाव कॅम्पपर्यंत गोदावरी परिक्रमा आणि सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. गोदावरी नदीचे पर्यावरणीय महत्त्व, नदीकाठची जैवविविधता, पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन याबाबत जनजागृती करण्यात आली. सप्ताहाच्या सांगता दिनी रॉयल रायडर सायकल ग्रुप नाशिकच्या सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

IND vs NZ 4th ODI: विराट कोहली शून्यावर क्लिनबोल्ड अन् झाली सचिन तेंडुलकरच्या 'नकोशा विक्रम'शी केली बरोबरी

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

Latest Marathi News Live Update: दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या महत्त्वाच्या बैठका

SCROLL FOR NEXT