नाशिक

जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल

CD
(टुडे पान एक मेन लिड) फोटो : NSK26H34335/ NSK26H34336 नंदुरबार : धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालय आवाराबाहेर थांबलेले न्यायालयीन कर्मचारी, वकील बांधव आणि नागरीक. दुसऱ्या छायाचित्रात श्र्वानपथकामार्फत परिसराची तपासणी करताना पथक. ------------------ जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई- मेल पोलिसांकडून तीन तास तपासणी; संशयास्पद वस्तू न आढळल्याने सुटकेचा नि:श्‍वास सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : येथील जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई- मेल प्राप्त झाला होता. यामुळे संपुर्ण परिसर तातडीने रिकामा करण्यात आला होता. न्यायालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती कळविल्यानंतर बॉम्ब पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला. शोध पथकातर्फे परिसराची कसून तपासणी करण्यात आली. यात परिसरात कुठलीही संशयास्पद वस्तु आढळून आली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. ------- नंदुरबार जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई- मेल प्राप्त झाला होता. त्यात जिल्हा न्यायालय ३.११ वाजता उडवून देण्याची धमकी दिली होती. हा ई- मेल प्राप्त झाल्यानंतर न्यायालय प्रशासनाने तातडीने याबाबत पोलिसात खबर दिली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, शहर पोलिस निरीक्षक संदीप पाटील हे अधिकारी तत्काळ न्यायालय परिसरात दाखल झाले. त्याचप्रमाणे बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू होती. या वेळी संपूर्ण न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला होता. तपासणीदरम्यान, न्यायालयीन कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले होते. पोलिसांकडून न्यायालयाच्या इमारतीत असलेले प्रत्येक दालन, परिसर, पार्किंगची जागा आदी भागात संशयित वस्तूंची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदरचा ई- मेल कोणी पाठविला, कुठून पाठवला गेला यबाबतचा तपास सायबर पोलिस करीत आहेत. ---------- जिल्हा न्यायालयाच्या ई- मेलवर धमकीचा मेल आलेला होता. यात बॉम्बने जिल्हा न्यायालय उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयाची इमारत रिकामी केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीनंतर अशी कोणतीही संशयास्पद वस्तू याठिकाणी आढळून आलेली नाही. नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. - मनोज मोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, नंदुरबार ------------- नंदुरबार जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई- मेल न्यायालयाला प्राप्त झाला होता. पोलिसांना याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर तातडीने यंत्रणा न्यायालय परिसरात दाखल झाली होती. या वेळी बॉम्बशोधक पथक, श्‍वान पथक मागविण्यात आले होते. सुमारे २ ते ३ तास न्यायालय परिसरात कसून तपासणी केली. - अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : 'संविधानाला धक्का लागू देणार नाही!' फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Dates & Coconut Ladoo: यंदाच्या दिवाळीत फराळात बनवा हटके पदार्थ! साखरेशिवाय तयार करा खजूर-नारळाचे पौष्टिक लाडू; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल!

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT