Teacher
Teacher  esakal
नाशिक

SAKAL Exclusive : मानधनापोटी तब्बल साडेअकरा कोटी खर्च! कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये अध्यापनासाठी निवृत्त शिक्षकांची नियुक्ती

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा

नामपूर : आगामी शैक्षणिक वर्षापासून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून समूह शाळा योजना राबविण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. संबंधित योजनेला शैक्षणिक वर्तुळातून विरोध होत असला तरी शालेय शिक्षण विभागाकडून कमी पटसंख्येच्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास एक हजार निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Nashik 11 half crore expenses for remuneration Recruitment of retired teachers for teaching in low enrollment schools nampur)

या शिक्षकांच्या मानधनावर ११ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

पवित्र प्रणालीमार्फत भरतीप्रक्रियेतून नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जुलैमध्ये घेतला होता. कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर ही नियुक्ती करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते.

या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञ, प्राथमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पालक आदींकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतरही काही जिल्ह्यांतील शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. (latest marathi news)

त्यानुसार राज्यात एक हजार निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या मानधनासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांनी ११ कोटी ४० लाख रुपयांचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावानुसार खर्च करण्यासाठीची प्रशासकीय मान्यता शिक्षण विभागाने दिली आहे.

शिक्षण विभागाने पुनर्विचार करावा

समूह शाळा योजनेमुळे सरकारी शाळांचे वाटोळे होणार असून, राज्यात सुमारे तीस हजारांहून अधिक पदे अतिरिक्त होण्याची भीती आहे. ‘शाळा समूह योजना’, ‘दत्तक शाळा योजना’ अशा योजना राबवून सरकारचा जिल्हा परिषदेच्या शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण विभागाने बॅकफूटवर यावे. निवृत्त शिक्षक संघटनांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष युवराज पवार यांनी म्हटले आहे.

जिल्हानिहाय नियुक्त निवृत्त शिक्षक

- रायगड : ६४

- पालघर : ४६

- रत्नागिरी : २२

- सिंधुदुर्ग : ५३

- जालना : २४९

- बुलडाणा : १८१

- सांगली : २७४

- कोल्हापूर : ६३

- एकूण निवृत्त शिक्षक : एक हजार

आकडे बोलतात...

- राज्याचे विद्यार्थी ः ५१ लाख २३ हजार ९५५

- जि. प.च्या शाळा ः ४२ लाख ४४ हजार २४४

- महापालिका शाळा ः सात लाख दोन हजार १६९

- पालिका शाळा ः एक लाख ७७ हजार ९५५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT