silencer destroyed by Road Roller (file photo) esakal
नाशिक

Nashik Police : कर्णकर्कश आवाजाच्या ‘त्या’ सायलेंसरचा भुगा! 111 सायलेंसर रोडरोलरने चिरडत केले नष्ट

Nashik Police : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करताना पोलिस आयुक्‍तालयातील परिमंडळ एकच्‍या क्षेत्रात दुचाकीचे सायलेंसर जप्त केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करताना पोलिस आयुक्‍तालयातील परिमंडळ एकच्‍या क्षेत्रात दुचाकीचे सायलेंसर जप्त केले होते. या सायलेंसरचा पुन्‍हा वापर केला जाऊ नये, यासाठी शुक्रवारी (ता.२२) अधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत परिमंडळ एक कार्यालयाच्‍या आवारात जप्त सायलेंसरवर रोडरोलर चालवत ते चिरडण्यात आले. (nashik silencer destroyed by Road Roller marathi news)

या कारवाईत एकूण १११ सायलेंसर नष्ट केले आहेत. सध्या परिक्षांचा कालावधी सुरु असून, रस्‍त्‍यांवर धावणाऱ्या वाहनांपैकी काही दुचाकींना बसविलेले मॉडिफाइड सायलेंसर नागरिक, विद्यार्थ्यांसाठी मनस्‍तापाचे कारण ठरत होते. या सायलेंसरमधून निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्‍या.

शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ एकअंतर्गत १४ ते २१ मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबवताना वाहनांची तपासणी करण्यात येत होती. या मोहिमेदरम्यान कर्णकर्कश आवाज करणारे दुचाकींचे सायलेंसर जप्त केले होते. एकूण १११ मॉडिफाइड सायलेंसर जप्त केले आहेत.

या जप्त केलेल्या सायलेंसरचा पुन्हा वापर होऊ नये, यासाठी परिमंडळ एक कार्यालयासमोरील मैदानात जप्त सायलेंसरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले. ही कारवाई पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या मार्गदर्शनखाली करण्यात आली.

''कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कारवाई तीव्र करणार आहे. त्‍यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. अन्‍यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे.''- किरणकुमार चव्‍हाण, पोलिस उपायुक्‍त. (latest marathi news)

पोलिस ठाणे निहाय जप्त केलेल्‍या सायलेंसरची संख्या अशी-

- आडगाव पोलिस ठाणे - ०८

- पंचवटी पोलिस ठाणे - ११

- भद्रकाली पोलिस ठाणे - १५

- गंगापूर पोलिस ठाणे २५

- म्हसरुळ पोलिस ठाणे - १४

- सरकारवाडा पोलिस ठाणे - ११

- मुंबईनाका पोलिस ठाणे - २७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT