Staff working on online registration in record room.
Staff working on online registration in record room. esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव तालुक्यामध्ये 15 लाख नोंदी ऑनलाइन!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील १५१ गावांमधील रेकॉर्ड रूम व तलाठी यांच्याकडील पोटखराबा पत्रक, जुने सातबारा, जन्म-मृत्यू नोंदी, फेरफार व इतर सर्व दस्त स्कॅन करून नागरिकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली. (Nashik online records Malegaon taluka marathi news)

मालेगाव तालुक्यात एकूण १५ लाख ६९२ नोंदी आहेत. या नोंदी स्कॅन करून ई-रेकॉर्ड्सच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम अतिशय मोठे व जिकिरीचे होते. तहसीलदार देवरे यांनी सहकाऱ्यांची मदत घेऊन हे काम मुदतीत पूर्ण केले. जिल्ह्यात नाशिक व निफाडपाठोपाठ मालेगावला सर्वाधिक नोंदी होत्या.

प्रांताधिकारी नितीन सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार देवरे यांनी भरत शेवाळे, प्रदीप भारस्कार, राहुल देशमुख यांच्या देखरेखीत नवीन कोतवाल, कर्मचारी यांची मदत घेऊन हे काम पूर्ण केले. या सुविधेमुळे तालुक्यात नागरिकांची पायपीट थांबणार असून, घरबसल्या ऑनलाइन नोंदी मिळणार आहेत. (Latest Marathi News)

दस्तऐवज येथे होणार उपलब्ध

१५ लाख नोंदी ई-रेकॉर्ड्सच्या माध्यमातून पूर्ण करणे हे काम जिकिरीचे होते. मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून ते पूर्ण केल्याचे श्री. देवरे यांनी सांगितले. हे दस्तऐवज ऑनलाइन http://aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT