Municipal officers and employees of solid waste management departments while taking penal action against establishments using plastic bags. esakal
नाशिक

Nashik News : प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई; पंचवटीत 25 हजारांचा दंड वसूल

Nashik : पंचवटी विभागीय कार्यालय हद्दीत प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटी विभागीय कार्यालय हद्दीत प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सोमवारी (ता.२९) ८० आस्थापनांची तपासणी केली. याप्रसंगी सिंगल युज प्लास्टिक वापर करताना आढळून आलेल्या ५ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच ६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी दिली. (25 thousand fine for plastic bag )

प्लास्टिक व अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतुकीवर राज्यात बंदी आहे. तरीही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर केला जातो. त्याअनुषंगाने पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिचंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या सूचनेनुसार पंचवटी विभागातील पथकामार्फत मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विभागातील ८० आस्थापना येथे सिंगल युज प्लास्टिक वापराबाबत तपासणी केली.

या तपासणीदरम्यान ५ आस्थापना सिंगल युज प्लास्टिक वापर करताना आढळून आल्याने पहिला गुन्हा ५ हजार रुपये प्रमाणे २५ हजार रुपये दंड वसूल करून ६ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या. मोहीम सुरू राहणार असून, व्यावसायिक तसेच नागरिकांनी पर्यावरणास बाधा निर्माण होणार नाही, यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले. मोहिमेत स्वच्छता निरीक्षक जितेंद्र परमार, सुशील परमार, प्रमोद बागूल, राकेश साबळे, सागर रेवर, ओम खैरनार व वाहनचालक संजय जाधव यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT