Maratha Survey Allowance
Maratha Survey Allowance esakal
नाशिक

Maratha Survey Allowance : 8 लाख कुटुंबियांच्या सर्वेक्षणासाठी 3 कोटी मानधन! नाशिक जिल्ह्यातील 10 हजार कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा

संतोष विंचू

येवला : मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे मानधन अद्यापही मिळाले नसल्याने त्याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रशिक्षकांसाठी मानधन उपलब्ध करून दिल्याने रखडलेल्या या प्रश्‍नाला चालना मिळाली आहे. (Nashik 3 crores allowance for maratha survey of 8 lakh families marathi news)

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारीपासून सर्वेक्षण करण्यात आले होते. ३७ पानांच्या या सर्वेक्षणामध्ये १८२ प्रश्‍न ॲपद्वारे भरले गेले.

तर एका कुटुंबातील माहिती भरताना २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागल्याने मोठा वेळ द्यावा लागला होता. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच महानगरपालिका व नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्वेक्षण करत असताना अनेक अडचणींना तोंड देत प्रगणकांनी यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडले.

या सर्वेक्षणासाठी मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सर्वेक्षण दोन महिने होत आले आहे. मात्र, कोणतेही मानधन प्रगणकांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे प्रगणकांना त्यांचे मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी विविध संघटना करत होत्या.

जिल्ह्यात ११ हजार २३२ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी ६ हजार ६८२ प्रगणक व ४५४ पर्यवेक्षकांची तर शहर सर्वेक्षणासाठी दोन हजार ५४६ प्रगणक व १५९ पर्यवेक्षक नियुक्त केले होते. मालेगाव महापालिका क्षेत्रासाठी एक हजार १६९ प्रगणक व ८० पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. तर देवळाली कँन्टोन्मेंटसाठी १३६ प्रगणक व सहा पर्यवेक्षक नियुक्त केले होते.

असे मिळणार मानधन!

प्रगणकांना मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रतिकुटुंब १०० रुपये व मागासवर्गीय कुटुंबासाठी १० रुपये मानधन व पाचशे रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे. तर या कामासाठी नेमलेल्या वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना बेसिक वेतनाच्या ५० टक्के मानधन दिले जाणार आहे.

परंतु, जानेवारीत सर्वेक्षण होऊनही अद्याप मानधन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. अखेर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव आ. उ. पाटील यांनी सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन पर्यवेक्षक व प्रशिक्षकांच्या मानधनासाठी रक्कम उपलब्ध करून दिली आहे.  (latest marathi news)

असे कुटुंब.. असे आहे मानधन

- जिल्ह्यात ७ हजार ६१ प्रगणक

- नाशिक शहरामध्ये २ हजार ४२८

- मालेगावमध्ये ६०७ प्रगणक

- जिल्ह्यात एकूण १० हजार ९६ प्रगणक

- १ लाख २० हजार ८५५ मराठा कुटुंबिय तर

- ६ लाख ५१ हजार ६१९ मागासवर्गीय कुटुंब

- मराठा व्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील ४७ हजार ८९३ कुटुंब

- एकूण ८ लाख २० हजार ३६७ कुटुंबीयांचे सर्वेक्षण

बँक खात्यावर वर्ग होणार रक्कम

खुल्या कुटुंबियांच्या सर्वेक्षणासाठी शंभर रुपयांप्रमाणे १ कोटी ६८ लाख ७४ हजार, तर मागासवर्गीय कुटुंबीयांसाठी दहा रुपयांप्रमाणे ६५ लाख १६ हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. तसेच प्रत्येकाला ५०० रुपये मानधन मिळणार असल्याने जिल्ह्यातील प्रगणकांना २ कोटी ८४ लाख ३८ हजार रुपये मानधन मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरच वितरित होईल.

आकडे बोलतात

भाग - प्रगणक संख्या - मिळणारे मानधन

जिल्हा - ७०६१ - १,८८,२७,२८०

नाशिक मनपा - २४२८ - ८२,४४,७००

मालेगाव मनपा - ६०७ - १३,६७,०१०

एकूण - १००९६ - २,८४,३८,९९० रू.

√ राज्यातील प्रगणक : १ लाख ९६ हजार

√ राज्यासाठी मानधन : ७५ कोटी २६ लाख

√ राज्यातील कुटुंब : १ कोटी ५८ लाख,२० हजार

√ मानधनासाठी मंजूर निधी : २८६ कोटी

"मराठा आरक्षण सर्वेक्षणाबाबत मागास वर्ग आयोग पुणे यांच्याकडे संपर्क केला असता प्रगणकांचे मानधन त्यांनी केलेल्या कुटुंब सर्वेक्षणानुसार मिळणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना प्रगणक मानधन पाठवले असून, लवकरच प्रगणकांची बँक माहिती मागवून मानधन पाठवले जाणार आहे."

- सोमनाथ खळे, तालुकाध्यक्ष, कास्ट्राइब शिक्षक संघटना, येवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT