Vehicle Registration esakal
नाशिक

Nashik Vehicle Registration : मालेगावला 32 हजार नवीन वाहनांची नोंदणी! विविध कारवाईतून 87 कोटींचा महसूल प्राप्त

Nashik News : मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मावळते आर्थिक वर्षे लाभदायी ठरले आहे

जलील शेख

मालेगाव : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मावळते आर्थिक वर्षे लाभदायी ठरले आहे. २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ३१ हजार ६१३ वाहनांची नोंद झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत वाहनांच्या संख्येतही ५३ ने वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ३१ हजार ५६२ वाहनांची नोंदणी झाली. यात एक हजार ५११ इलेक्ट्रीक वाहने आहेत. (Nashik 32 thousand new vehicles registered in Malegaon marathi news)

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. विभागाला तडजोड शुल्क, दंड वसुली, नवीन वाहन नोंदणी, वाहन चालवण्याचे परवाने, वायुवेग पथकांमार्फत करण्यात येणारी कारवाई, पर्यावरण कर, योग्यता प्रमाणपत्र, लोडिंग, विना हेल्मेट, सीट बेल्ट न लावणे, फिटनेस, चॉईस नंबर, यासह विविध प्रकारच्या कारवायातून ८७ कोटी ३० लाखाचा महसूल मिळाला आहे. यात ८३ कोटी ९१ लाख १२ हजार महसूलातून तर तडजोड शुल्कातून तीन कोटी १७ लक्ष २२ हजार तसेच दंड वसुलीतून २२ लाख ४७ हजार मिळाले आहे.

दुचाकींची संख्या अधिक

नवीन वाहन नोंदणीमध्ये ट्रॅक्टर, डंपर, मालवाहू, दुचाकी, प्रवासी वाहने, चारचाकी वाहने, रिक्षा, मालवाहू रिक्षा, क्रेन, पोकलँड, रुग्णवाहिका, बस, मोपेड, ट्रेलर आदी प्रकारच्या वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात सर्वात जास्त २३ हजार ४३४ दुचाकींची नोंदणी झाली आहे. पेट्रोल दुचाकी बरोबर येथे इलेक्ट्रिक दुचाकीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.  (latest marathi news)

अशी झाली वाहनांची नोंदणी

दुचाकी २३ हजार ४३४

कार २ हजार ३९०

टँकर ८४

ट्रॅक्टर २ हजार ९२६

इ वाहने १ हजार ५११

इतर वाहने ५हजार ७०५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT