railway track death esakal
नाशिक

Nashik News : रेल्वे रुळावर आठ महिन्यांत 46 जणांनी संपवले जीवन! कसबे सुकेने ते इगतपुरीदरम्यान संख्या वाढली

Latest Nashik News : रेल्वेखाली जीवन संपवणाऱ्यांची संख्या वाढल्याचे आरपीएफचे पोलिस निरीक्षक हरफुलसिंह यादव यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : येथील रेल्वे स्थानकाअंतर्गत येणाऱ्या ७४ किलोमीटरच्या कसबे सुकेने ते इगतपुरी या रेल्वे लाईन दरम्यान ४६ व्यक्तींनी आत्महत्या केल्याची नोंद जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या आठ महिन्यांत झाली आहे. त्यामुळे रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे आरपीएफचे पोलिस निरीक्षक हरफुलसिंह यादव यांनी सांगितले. (46 people lost their lives on railway track in eight months)

नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या आसपास आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात पवारवाडी, देवळाली, भगूर, रेल्वेलाईन तसेच देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनपासून तर इगतपुरी दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक आत्महत्या लोकांच्या प्रसंगावधानाने वाचल्या आहेत.

तर रिमोट परिसरामध्ये रेल्वे खाली आत्महत्या होतच राहतात. एकट्या सप्टेंबर महिन्यामध्ये सहा लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दप्तरी करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे रुळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांना हे भयानक वास्तव पाहायला मिळत आहे. आरपीएफचे साठ कर्मचारी वेगवेगळ्या गाड्यांमध्ये तैनात असतात. अनेकवेळा आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी संभाव्य आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना त्यापासून रोखल्याचे सांगण्यात आले. (latest marathi news)

"कसबे सुकेने ते पवारवाडी दरम्यान आणि देवळाली ते इगतपुरी दरम्यान रेल्वे लाईनला आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान ४६ लोकांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. अनेक अपघात आरपीएफच्या जवानांमुळे आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमुळे वाचले आहेत."- हरफुलसिंह यादव, पोलिस निरीक्षक आरपीएफ नाशिक रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT