NMC School esakal
नाशिक

NMC School : महापालिका शाळांमधील 656 वर्गखोल्या Digital! स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण

Nashik News : महापालिकेच्या ८२ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या ८२ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या शाळांमधील ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित करण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक कक्षाचे रूपांतर नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ६९ शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. (Nashik NMC Smart School Project marathi news)

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक अशा एकूण १०० शाळा आहेत. या शाळांमधून २९ हजार ८५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ८२ शाळांमधील ६५६ वर्गखोल्यांमध्ये डिजिटल कन्टेन्ट, इंटरनेट व स्कूल अॅडमिनिस्ट्रेशन सॉफ्टवेअर, लॅन कनेक्टिव्हिटी युक्त ७५ इंची डिजिटल फळा उभारण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे या शाळांमध्ये ग्रीन बोर्ड आणि सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बॅच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाईट‌्स, छतावरील पंखे पुरविण्यात आले असून रंगकाम आणि किरकोळ दुरुस्तीची कामेदेखील करण्यात आली आहे. संबंधित मक्तेदाराच्या माध्यमातून पाच वर्षे मुदतीकरीता या प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

८ फेब्रुवारी २०२३ पासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी सहा महिन्यांची मुदत होती. काम सुरू होऊन आता वर्ष उलटले आहे. काठे गल्ली भागातील अटल बिहारी वाजपेयी शाळा प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट स्कूलमध्ये परावर्तित करण्यात आली. त्यानंतर सर्वच शाळांमध्ये एकाच वेळी या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली गेली.

सर्वच ६९ शाळांमधील संगणक कक्ष व मुख्याध्यापक कक्षाचे काम पूर्ण झाले असून शालेय वर्गात डिजिटल पॅनल बसविण्यात आले आहेत. सर्व शाळांना क्लाऊड आधारित शाळा प्रशासन सॉफ्टवेअर, २०० एमबीपीएसच्या किमान गतीसह ब्रॉडबॅण्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरविण्यात आलेली असून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

असा आहे स्मार्ट स्कूल प्रकल्प

* मनपाच्या ८२ शाळांमध्ये प्रकल्पांची अंमलबजावणी

* ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित

* ६९ शाळांमध्ये संगणक कक्ष स्थापन

* प्रत्येक संगणक कक्षात २० संगणक, सर्व्हर, प्रिंटर आणि लॅन कनेक्टिव्हिटी

* प्रत्येक शाळेसाठी मुख्याध्यापकांच्या दालनात नियंत्रण कक्ष

* प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ८०० शिक्षकांना प्रशिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT