Abu Salem esakal
नाशिक

Mumbai Bomb Blast Case : अबू सालेमचा मुक्काम नाशिक रोड कारागृहात! कडेकोट बंदोबस्तात तळोजाहून स्थलांतर

Nashik News : कुख्यात गॅंगस्टर व दहशतवादी अबू सालेमला गुरुवारी (ता. १८) कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिक रोड मध्यवर्ती कार्यालयात आणण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कुख्यात गॅंगस्टर व दहशतवादी अबू सालेमला गुरुवारी (ता. १८) कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिक रोड मध्यवर्ती कार्यालयात आणण्यात आले. अनेक दिवसांपासून त्याला नाशिकमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होत्या. कारागृहातील अंडासेलमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. अबू सालेम नवी मुंबईतील तळोजा कारागृहात होता.

मात्र, ते सुरक्षित नाही, असा अहवाल आल्यावर तसेच कारागृहातील बांधकामासंदर्भात काही सुधारणा करावयाच्या असल्याने त्याला इतर कारागृहात हलवावे, याबद्दल न्यायालयानेही कारागृहाचे मत मागविले होते. त्यानुसार अतिशय गुप्तता पाळत एटीएस व एसआरपीएफ यांच्या ताफ्यात सालेमला नाशिक कारागृहात आणण्यात आले.

नाशिक पोलिस आयुक्तालयात काही मोजक्याच अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती होती. तळोजा येथून आणतानाही जिल्हा सीमेच्या दरम्यान बंदोबस्त हस्तांतरित होतानाही कमालीची गुप्तता पाळली गेली. तळोजा कारागृहात ज्या सेलमध्ये अबू सालेम होता, तेथील काही सेलच्या भिंती व सिलिंग कमकुवत झाले आहे.

त्यामुळे त्याची दुरुस्ती अथवा नव्याने उभारण्यात यावे, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने तळोजा कारागृहाला दिला होता. त्यामुळे अबू सालेमबरोबरच आणखी काही कैदी इतरत्र हलविण्यात आले. येरवडा कारागृहातील सेलची क्षमता पूर्ण असल्याने तेथे अतिरिक्त कैदी ठेवता येणार नाहीत, त्यामुळे तळोजापासून नाशिक जवळच असल्याने येथे हलविण्यात आले. (latest marathi news)

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी

अबू सालेम हा मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील आरोपी असून, तळोजा कारागृहातून इतरत्र स्थलांतर करण्यास परवानगी नाकारण्याची याचिकेद्वारे विनंती करण्यात आली होती. सुनावणीअंती पुढील आदेश येईपर्यंत तळोजा कारागृहातून अबू सालेमचे स्थलांतर करू नये, असे निर्देश विशेष न्यायालयाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मात्र कारागृह प्रशासनाचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने स्थलांतराला परवानगी दिली.

पोर्तुगालमधून आणले भारतात

एकोणीस वर्षांपूर्वी पोर्तुगालमधून अबू सालेमला भारतात आणले होते. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्या गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झालेली आहे, त्या गुन्ह्यातील शिक्षा संपत आली आहे. पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झाल्यावर अबू सालेमला ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, तेथे त्याच्यावर हल्ला झाल्यावर त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले. भारतात प्रत्यार्पित केल्यावर १९ वर्षांपासून अबू सालेम तुरुंगातच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT