Accident News
Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : चाळीसगाव -मालेगाव रस्त्यावर अपघातात 2 ठार; 11 जखमी

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर : चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर दहिवाळ गावाजवळ आर्टिका व ॲपेची जोरदार धडक होऊन दोन जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. दहिवाळ गावाजवळ असलेल्या वळण रस्त्यावर झालेला या अपघातात दोन्ही वाहने धडकेमुळे रस्त्याच्या कडेला खड्ड्यात फेकली गेली होती. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमीत सात जण पिंप्राळे (ता. चाळीसगाव), दोघे चाळीसगाव आणि प्रत्येकी एक महिला भडगाव व चोपडा येथील आहेत. (Nashik Accident 2 killed in accident on Chalisgaon Malegaon road)

आर्टिका (एमएच ४१, व्ही ७५८२) चाळीसगावहून येत होती आणि ॲपे रिक्षा ( एमएच १९, बीजे ५२०७) मालेगावहून चाळीसगावकडे जात होती. रात्रीची वेळ असल्याने वळणावर दोघांची टक्कर झाली. त्यात दोन जण जखमी झाले, त्यांना तातडीने मालेगावच्या सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांना तपासणीअंती वैद्यकीय अधिकारींनी मृत घोषित केले. इतर जखमीवर उपचार सुरू आहेत. (latest marathi news)

जखमींमध्ये सखाराम जगन पवार, कमलबाई सखाराम पवार, मंगेश सखाराम पवार, ज्योतिबाई मंगेश पवार, सोमाबाई वाल्मीक पवार, गणेश मंगेश पवार, हरी मोहन पवार,( रा. पिंप्राळे, ता.चाळीसगाव), चैतन्य भगतसिंग राजपूत, भगतसिंग सुरसिंग राजपूत (रा. चाळीसगाव), बेबाबाई धनसिंग पाटील,(कजगाव, ता.भडगाव), सुकदेव तुळशीराम बिराडे, (रा. चोपडा), लताबाई सुखदेव अहिरे (रा. भायगाव रोड, मालेगाव) यांचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच मालेगाव मनपाचे नगरसेवक मदन गायकवाड यांनी धाव घेऊन जखमींची विचारपूस करत मदत केली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT