fire broke out at an electric bike manufacturing company near Ambad Link Road. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : सातपूरला इलेक्ट्रिक दुचाकी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी भस्मसात

Nashik Fire Accident : अंबड लिंक रोडलगत बजरंग नगरमधील इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून कंपनी भस्मसात झाल्याची घटना शनिवारी (ता.१६) घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident : येथील अंबड लिंक रोडलगत बजरंग नगरमधील इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून कंपनी भस्मसात झाल्याची घटना शनिवारी (ता.१६) घडली. बजरंग नगरमध्ये भाडेतत्त्वावरील गोडाऊनमध्ये मानसा ऑटोमेशन इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल दुचाकी बनवल्या जातात. या गोडाऊनला शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. (Nashik Accident electric two wheeler manufacturing company was gutted by massive fire)

शनिवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे घटना घडली तेव्हा घटनास्थळी कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती सातपूर अग्निशमन केंद्रास स्थानिक व्यक्तीने कळवली.

सातपूर अग्निशमन केंद्राच्या बंबाने आग नियंत्रणात येत नसल्याने सिडको, अंबड, पंचवटी आदी विभागांच्या अग्निशमन बंबांच्या सह्याने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे शक्यता वर्तविण्यात आली आहे. आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

कंपनीचे मालक हिमांशू रवींद्र केडिया हे घटना घडली त्यादिवशी बाहेरगावी गेले होते. हिमांशू यांनी संदीप फाउंडेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण करून मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट अप ऑटोमोबाईल कंपनी स्थापना करण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी दोन वर्षांपूर्वी ही कंपनी सुरु केली होती.

कंपनी यशस्वी होत असतानाच आगीच्या दुर्घटनेमुळे खूप नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीत विक्रीसाठी तयार असलेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहने व कच्चा माल, बॅटऱ्या जळून खाक झाल्या आहेत.

यावेळी अग्निशमन सातपूर विभागाचे सब ऑफिसर पी. बी परदेशी, लिडींग फायरमन एस. आर पगार, फायरमन विजय ठाकूर, आर. आर खारे, शुभम लाड, यतीन आतकाडे, अग्निशमन दलाच्या फायरमन यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे आदींसह कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव अजूनही फरार

SCROLL FOR NEXT