accident  esakal
नाशिक

Nashik Accident News : 2 वेगवेगळ्या अपघातात 2 महिला ठार

Nashik Accident : पंचवटीतील अमृतधाम चौफुली येथे भरधाव वेगातील टँकरच्या धडकेत स्कुटीस्वार महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीतील अमृतधाम चौफुली येथे भरधाव वेगातील टँकरच्या धडकेत स्कुटीस्वार महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर, दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल येथे भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचारी महिला ठार झाल्याची घटना घडली. या दोन्ही अपघातप्रकरणी वाहनचालकांविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. (Nashik Accident marathi news)

अश्विनी पंडित शेजवळ (२३, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद रोड) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलीस हवालदार गणेश सुरेश माळवाळ यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता. १७) दुपारी एक वाजेच्या सुमारास अश्विनी शेजवळ या अमृतधाम चौफुलीवरून जात असताना, त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरने जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या अश्विनी शेजवळ यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात टँकर चालक राजाराम भगीरथ सिंग (५८, रा. तुळसीपुरा, मुरैना, मध्यप्रदेश) याच्याविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला सहायक पोलीस निरीक्षक गावित या तपास करीत आहेत.

तसेच, दिंडोरी रोडवरील तारवाला सिग्नल येथे भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचारी महिला ठार झाली. गेल्या शुक्रवारी (ता. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास दिंडोरी रोडवरील तारवाला नगर सिग्नलकडे ज्योती शंकर वाघ (४५, रा. कालिकानगर, पंचवटी) या पायी जात होत्या.

त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्या मृत्यु झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( latest marathi news )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

Baramati News : वीजेच्या वाढत्या मागणीमुळे ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरु

SCROLL FOR NEXT