Nashik Police Commissioner Sandip Karnik & Department action on Government plates vehicle esakal
नाशिक

Nashik Police : सरकारी पाट्या लावणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा! शहर पोलिसांकडून पावणे दोनशे वाहनांवर दंडात्मक कारवाई

Nashik News : यासंदर्भातील विशेष वृत्त ‘दैनिक सकाळ’मध्ये ‘खासगी वाहनांवर सरकारी नावांच्या पाट्या’ या ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : खासगी वाहनांवर सरकारी पाट्या लावून मिरवणाऱ्या वाहनांविरोधात शहर पोलीस, वाहतूक शाखेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल १८० वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याने बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांना दणका दिला आहे. (Nashik Action on vehicles with government plates)

गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल १८० वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याने बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांना दणका दिला आहे.

खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन, भारत सरकार, पोलीस यासह सरकारी कार्यालयांचे नामनिर्देशन असलेल्या पाट्या लावून मिरविल्या जातात. अशाप्रकारे सरकारी पाट्या खासगी वाहनांना लावणे बेकायदेशीर असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. त्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. यासंदर्भातील विशेष वृत्त ‘दैनिक सकाळ’मध्ये ‘खासगी वाहनांवर सरकारी नावांच्या पाट्या’ या ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत शहरात सरकारी पाट्या लावून फिरणाऱ्या खासगी वाहनांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गेल्या तीन दिवसांमध्ये १८० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्याकडील खासगी वाहनांवरील ‘पोलीस’ नावाची पाटी, लोगो काढून घेण्याची ताकीद दिली आहे. आयुक्तालयाच्या या कारवाईमुळे सरकारी पाट्या आपल्यावर वाहनांवर लावून मिरवणाऱ्यांचे धाबेच दणाणले आहे.

तीन दिवसातील कारवाई

सोमवार, २९ जुलै : २८

मंगळवार, ३० जुलै : ६७

बुधवार, ३१ जुलै : ८५

एकूण : १८०

(latest marathi news)

गेल्या तीन दिवसांमध्ये १८० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरही व्हायरल

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, ‘भारत सरकार’, ‘पोलीस’ यासह विविध सरकारी कार्यालयाचे नामनिर्देशन करणाऱ्या पाट्या असलेल्या वाहनांवर सुरू असलेल्या कारवाईचे छायाचित्रांसह माहिती शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. ‘एक्स’, फेसबुक, इन्स्ट्राग्राम या सोशल मीडियाच्या पोलीस आयुक्तालयाच्या अकाऊंटवर कारवाईचे फोटो व संदेश व्हायरल केल्याने त्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

"शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस ठाणेनिहाय व वाहतूक शाखेच्या चारही विभागांकडून सरकारी नावांच्या पाट्या लावणार्या वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू असून, ती यापुढेही सुरू राहील. वाहनचालकांनी कायद्याचे उल्लंघन न करता पालन करावे."

- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT