crime esakal
नाशिक

Nashik Crime News : अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

Nashik Crime : जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. यात अपघातग्रस्त युवक उपचारासाठी दुचाकी घटनास्थळी सोडून रुग्णालयात गेला अन् चोरट्याने नेमकी हीच संधी साधून अपघातस्थळी असलेली दुचाकीच चोरून नेली. ( After accident driver was admitted to hospital and thief stole bike )

यामुळे अपघातग्रस्त युवकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले असून, त्याने नाशिक रोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. अजिंक्य सुभाष घोडेराव (रा. शहा, ता. सिन्नर) याच्या फिर्यादीनुसार, तो शनिवारी (ता. २०) मध्यरात्री कन्या कोठारी शाळेमागील रस्त्याने दुचाकीवरून जात होता. भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या वडाच्या झाडाजवळ घसरून अपघात झाला. या अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. (Latest Marathi News)

त्यामुळे त्याने दुचाकी तिथेच सोडून उपचारासाठी रुग्णालय गाठले. याच संधीचा चोरट्याने फायदा घेत अजिंक्यची दुचाकी (एमएच ४७, आर ७३५६) आणि घटनास्थळी पडलेला मोबाईल चोरून नेला. अजिंक्यने उपचारानंतर शनिवारी (ता. २७) पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार भोळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Cut September 2025: LPG सिलिंडर झाला स्वस्त! दिल्ली-मुंबईत किती घट? तपासा ताजे दर

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता महिलाही धडकणार, गौरी विसर्जनानंतर लढ्याला उतरणार!

Live Breaking News Updates In Marathi: डॉकयार्ड परिसरात मराठा आंदोलकांची अंघोळ

Ganesh festival २०२५: टाळ्या अन्‌ शिट्ट्यांची साद! 'पुण्याच्या मध्यवस्तीत रविवारी गर्दीचा उच्चांक'; सुट्टीचा लुटला आनंद

Pune Metro: मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचे ‘विघ्न’ दूर; भाविकांचा प्रवास सुसह्य, एका दिवसात ५५४ फेऱ्या, सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक

SCROLL FOR NEXT