apple esakal
नाशिक

Nashik Apple Rates : सफरचंदाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात! काश्मीर, सिमलाकडील आवकेत वाढ; ग्राहकांमध्ये समाधान

Latest Nashik News : एरवी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले सफरचंदाचे दर आवाक्यात आल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे

एस.डी.आहिरे

पिंपळगाव बसवंत : मागील काही दिवसांपासून सफरचंदाची आवक - वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली आहे. एरवी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले सफरचंदाचे दर आवाक्यात आल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे. (Apple rates within reach of common man)

नुकतेच गौरी-गणपतीचे सण साजरा झाला आहे. या सणासुदीच्या काळात भाजीपाल्यासह फळांनाही मोठी मागणी असते. त्यामुळे फळांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून इतर फळांच्या तुलनेत सफरचंदाचे दर घसरले आहेत.

पूर्वी १५० ते २०० रुपये किलो असलेले सफरचंद आता १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. सध्या काश्मीर, सिमलाच्या सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे तेथून आवक वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील फ्रूट मार्केटमध्ये शिमला, काश्मीर येथून आवक होते.

यामध्ये रेड गोल्डन, ग्रीन गोल्डन, रिचड, रॉयल असे चार प्रकारचे सफरचंद जिल्ह्यात येतात. काश्मीर येथून आलेल्या सफरचंदाची गोडी अधिक तर खायला नरम आहे. परिणामी सिमला येथील सफरचंद खायला कडक आहेत. (latest marathi news)

आजारपणात किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या नातेवाइकांना खाण्यासाठी घेऊन जाणाऱ्या फळात सफरचंद वापरले जाते. तसेच, महागडे फळ म्हणूनही सफरचंदाकडे पाहिले जाते. पण, आता दर आवाक्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहक मनमुरादपणे सफरचंद खरेदी करत आहेत.

"काश्मीर आणि सिमला येथील सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे जालना फ्रूट मार्केटमध्ये आवक वाढली. सध्या १०० ते १२० रुपये दराने विक्री होत आहे. भाव कमी झाल्याने ग्राहकही मोठ्या प्रमाणात सफरचंद खरेदी करत आहेत."

- संतोष निकम (फळ व्यापारी, पिंपळगाव बसवंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT