Nashik Talathi Bharti esakal
नाशिक

Nashik Talathi Bharti : जिल्ह्यातील 96 तलाठ्यांना आज नियुक्ती! आदिवासी भागातील 67 जागांची भरती रखडली

Nashik News : दोन वर्षांपासून रखडलेल्या तलाठी भरती प्रक्रियेतील बिगर आदिवासी भागातील १७३ पैकी ९६ तलाठ्यांना गुरुवारी (ता. १) नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दोन वर्षांपासून रखडलेल्या तलाठी भरती प्रक्रियेतील बिगर आदिवासी भागातील १७३ पैकी ९६ तलाठ्यांना गुरुवारी (ता. १) नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. उर्वरित ६७ तलाठ्यांची समांतर आरक्षणामुळे नियुक्ती रखडली; तर १० उमेदवारांना जिल्हा समितीने अपात्र ठरविले. तसेच, १५९ उमेदवारांची प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. (Appointment of 96 talathi in district today)

संपूर्ण राज्यात चार हजार ४४६ पदांची मेगी भरती २०२२-२३ मध्ये जाहीर झाल्यावर परीक्षा पार पडली. नाशिक जिल्ह्यात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या दरम्यान परीक्षा झाली. ११ मार्च २०२४ ला सुधारित गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्याचवेळी संपूर्ण राज्यातील निवड आणि प्रतीक्षा यादीही जाहीर झाली.

त्यानंतर पेसा वगळून इतर क्षेत्रांतील जागांवर नियुक्ती देण्यास कुठलीही अडचण नसताना अन उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असतानाही अद्याप त्यांना नियुक्ती दिली नव्हती. या विरोधात निवड यादीतील उमेदवारांनीच आवाज उठविण्यास सुरवात केली. २४ जूनला ‘मॅट’ने १३ पेसा जिल्ह्यांतील पेसा क्षेत्र वगळून इतर जागांवरील स्टे उठविला आहे. (latest marathi news)

त्यात नाशिक जिल्हाही समाविष्ट असल्याने त्वरित नियुक्तीची मागणी लावून धरल्यावर लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर पुन्हा विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ निवडणूक यांच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला होता. आता जिल्हा प्रशासनाने पात्र ठरलेल्या बिगर पेसा क्षेत्रातील ९६ उमेदवारांना गुरुवारी नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.

यामुळे रखडली ६७ जणांची नियुक्ती

एकूण १७३ उमदेवारांची निवड यादी जाहीर झाली होती. त्यातील ९६ उमदेवारांनाच अंतिम निवड दिली जाणार आहे. १० जणांना अपात्र ठरविले असून, ६७ जणांची नियुक्ती विविध कारणांनी रखडली. त्यात २१ उमेदवारांचा समांतर आरक्षण अहवाल प्रलंबित असून, २३ माजी सैनिक उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू आहे. २३ उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर होते. त्यांची ५ ऑगस्टला पडताळणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT