Ganesh Shinde, Sanjay Shinde, Prashant Shinkar, Sameer Samaddia etc. while felicitating police inspector Vilas Pujari who arrested various accused and the police.
Ganesh Shinde, Sanjay Shinde, Prashant Shinkar, Sameer Samaddia etc. while felicitating police inspector Vilas Pujari who arrested various accused and the police. esakal
नाशिक

Nashik News : चोरट्यांना जेरबंद करणाऱ्या पोलिसांवर कौतुकाची थाप! येवला शहर पोलिसांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात घडलेल्या चोरीच्या घटनांचा जलद तपास लाऊन गुन्हेगारांना जेरबंद केल्याबद्दल शहर पोलिसांचा शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शिंदे फाउंडेशनच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. मागील काही दिवसांपासून येवला शहरांमध्ये मोटरसायकल चोरी, घरफोडी व भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली होती. सततच्या अशा घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nashik appreciation for police who jailed thieves in yeola marathi news)

घर बंद दिसले की हमखास चोरी झालीच समजा अशी स्थिती निर्माण झाली आहे. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस ॲक्शन मोडवर आले असून, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक चोरीच्या घटनांचा जलद तपास करून आरोपीदेखील जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. अनेक तक्रारदारांना आपला चोरी गेलेला मुद्देमाल देखील परत मिळाला आहे.

शहर पोलिसांच्या या कौतुकास्पद कार्याची दखल घेत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, पोलिस कर्मचारी बाबा पवार, गणेश पवार, इतर तपासी अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिंदे, मार्गदर्शक संजय शिंदे, प्रशांत शिनकर, समीर समदडीया, नाना लहरे, राजू परदेशी, संतोष मिस्कीन, नितीन कुक्कर, किरण सरोदे, सोनू परदेशी, कुंदन झोंड, गणेश भावसार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दुचाकीचोरीचे सहा गुन्हे उघड!

चेनस्नॅचिंग करणाऱ्या संशयितांच्या चौकशीतून मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघड झाले असून, या चोऱ्यांमधील एकूण तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. संशयिताने शहरातील हुडको, वल्लभनगर व मातोश्री हॉटेल फत्तेबुरूज नाका येथून एकूण तीन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.

यामध्ये साथीदार प्रशांत जनार्दन जाधव उर्फ बाबू, तुषार भोसले (दोघे रा. राहाता, जि. अहमदनगर), विजय टाक (रा. कोपरगाव) यांचा सहभाग आहे. पोलिसांनी संशयित विजय टाक यास अटक करून चोरीच्या तीन मोटरसायकली असा एक लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील तिसरा संशयित बाबू जाधव सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे. तर, फरारी असलेल्या तुषार भोसलेचा शोध सुरू आहे.

सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन

चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या किरण नवनाथ गायकवाड (वय २२, रा. निवाणी वडगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदगनर), सागर गोरख मांजरे (रा. कल्याण रोड, शिवाजीनगर, अहमदनगर, सध्या रा. गाजरे मळा, सिन्नर) या दोघांनी शहरातील चेनस्नॅचिंगसह शिंपी गल्ली, पाटीलवाडा व पटेल कॉलनीतून तीन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, शहरातील सर्व नागरिक व व्यावसायिकांनी घर व दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले आहे.

''पोलिसांकडून आपण नेहेमीच गुन्हेगार पकडण्याची अपेक्षा ठेवतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक व्हायला पाहिजे, या हेतूने आम्ही हा गौरव केला. एकाचवेळी अनेक गुन्ह्यातील आरोपींना पकडणे नक्कीच कौतुकास्पद आहे.''- गणेश शिंदे, अध्यक्ष, शिंदे पाटील फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT