potato esakal
नाशिक

Nashik News : ‘बटाट्या’ने बिघडविले गृहिणी, सर्वसामान्यांचे बजेट; किरकोळ बाजारात 20 रुपयांवरून 35 ते 40 चा भाव

Nashik : सर्वसामान्यांना या महागाईचा विविध अंगांनी फटका बसतो. दररोजच्या भाज्यांच्या किमती तर आवाक्याबाहेर चालल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

निखिलकुमार रोकडे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘महागाईने आज जगण्याच्या जवळपास सर्वच क्षेत्रांना कवेत घेतले आहे. सर्वसामान्यांना या महागाईचा विविध अंगांनी फटका बसतो. दररोजच्या भाज्यांच्या किमती तर आवाक्याबाहेर चालल्या आहेत. अशा स्थितीत रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असणारा बटाटाही मागे राहिलेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी २० रुपये किलोला मिळणारा बटाटा आजघडीला ३५ रुपयांवर जाऊन पोहोचल्याने महिलांचे बजेट बिघडले आहे. दुसरीकडे बटाटावडाही महागण्याची शक्यता आहे. (As price of potato has reached Rs 35 women budget has been ruined )

सर्वसामान्यांच्या दररोजच्या आहारात बटाटा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. श्रमिकांसाठी बटाटेवडा आणि रस्सा असे समीकरण आहे. बटाटा नाही अशी एकही रेसिपी नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परराज्यांतून घटलेली आवक आणि मुंबईला मिळणारा जास्तीचा भाव यामुळे स्थानिक बाजारपेठेत बटाटा वधारला आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

पंधरा-वीस दिवसांपूर्वी सर्वसाधारणपणे २० रुपये प्रतिकिलोने मिळणारा बटाटा आता थेट ३५ ते ४० रुपये किलोने मिळत आहे. अचानक दुप्पट झालेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली. निसर्गाच्या ऋतुचक्रात अनेक बदल होत आहेत. त्यामुळे राज्यात वळिवाचा पाऊस होतो. अनेक पिकांना त्याचा फटका बसला आहे.

यात प्रामुख्याने भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. उत्तर भारतातून शेतकरी व्यापाऱ्यांना न देता स्वतः बटाटा नाशिकमध्ये विक्रीसाठी घेऊन येत आहेत. नाशिकमध्ये चांगला भाव मिळाला तर ठीक, अन्यथा थेट मुंबईला अधिक दराने विक्री होते. त्यामुळे बटाट्याचे भाव वाढले आहेत. बटाटा हा आहारातील असा प्रकार आहे, की जेवणाबरोबरच अनेक खाद्यप्रकारांमध्ये वापरला जातो. आहारातील नाश्‍ता, फास्ट फूड, अथवा जेवण यातील अनेक पदार्थ हे बटाट्याचे असतात. (latest marathi news)

सर्वाधिक खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा बटाटा हा एकमेव आहे. उत्तर भारतात तर प्रत्येक भाजीत बटाटाच वापरला जातो. आरोग्याबद्दल आज अनेक नागरिक जागरूक आहेत. तरीही सर्वाधिक सेवन बटाट्याच्या माध्यमातून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे केले जाते. याच पद्धतीत आहारातील आवश्यक घटकांचे भाव वाढत असतील तर निश्चितच सर्वसामान्यांना ही वाढ परवडणारी नाही.

थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

अचानक भाव वाढला, याचे कारण उत्तर भारतातून होणारी बटाट्याची आवक मंदावली आहे. पूर्वी शेतकरी व्यापाऱ्यांना बटाटा द्यायचे. त्यानंतरचे उर्वरित व्यवहार ऑनलाइनद्वारे करीत असत. मात्र, व्यापाऱ्यांना दिल्यावर ते किती दराने बाजारात विक्री करतात, याची तफावत समजल्याने शेतकरी आता थेट स्वतःच नाशिकमध्ये विक्रीसाठी येत आहेत. नाशिकमध्ये भाव मिळाला तर ठीक. नाही तर तेथून लगेच मुंबईला जात आहेत. निश्चितच तेथे अधिक भाव मिळतो.

''बटाटा हा स्वयंपाकातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्याची किंमत अचानकपणे दुप्पट झाल्याने किचनमधले बजेट बिघडत जाईल. रोजच्या जीवनातील अत्यावश्यक असणाऱ्या बाबींच्या किमतींवर नियंत्रण असायला हवे.''- वैशाली राठोड, गृहिणी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

Kedarnath Tourism: मुंबईहून केदारनाथपर्यंत ट्रिप प्लॅन करताय? मग सर्व मार्ग आणि टिप्स जाणून घ्या एका क्लिकवर

Women’s World Cup Final : जगात भारी, आपल्या पोरी! शफाली वर्माने मोडला सेहवागचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम

Minister Chandrashekhar Bawankule: अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

SCROLL FOR NEXT