Sudhakar Badgujar and Vasant Gite  esakal
नाशिक

Nashik Assembly Election : सुधाकर बडगुजर, वसंत गितेंना उमेदवारीचा ठराव; भगवा सप्ताहांतर्गत बैठक

Nashik News : आगामी विधानसभा मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी व महायुती असे दोन घटक निवडणुकीत आमनेसामने येतील.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उबाठा पक्षाकडून सुरू असलेल्या भगवा सप्ताहांतर्गत झालेल्या बैठकीत पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून वसंत गिते यांना उमेदवारी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सदरचा ठराव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाणार आहे. (Nashik Assembly Election)

आगामी विधानसभा मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी व महायुती असे दोन घटक निवडणुकीत आमनेसामने येतील. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा पक्ष, शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे तीन महत्त्वाचे पक्ष आहे.

महायुतीमध्ये प्रामुख्याने भाजप, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून नाशिक जिल्ह्यात निवडणुकीची तयारी सुरू आहे. नाशिक शहरांमधील पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. गुरुवारी (ता. १) पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी बैठक झाली.

यात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तर मध्य विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार वसंत गिते यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. गिते व बडगुजर या दोघांच्या उमेदवारीचा ठराव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाणार आहे. (latest marathi news)

महाविकास आघाडीत धुसफूसची चिन्हे

शिवसेना उबाठा पक्षाकडून पश्चिममध्ये बडगुजर, उत्तर मध्यमधून गिते यांच्या नावाचा ठराव करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दावा आहे. येथून काँग्रेसला उमेदवारी मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काहींनी अर्जदेखील केला आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षानेदेखील मध्य मतदारसंघामधून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मात्र शिवसेनेकडून पश्चिम व मध्य मतदारसंघात दावा केला जात असल्याने महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT