Anti Narcotics Cycle Rally esakal
नाशिक

Anti Narcotics Cycle Rally : अंमली पदार्थविरोधात सायकल रॅलीने वेधले लक्ष! शहर पोलीस आयुक्तालय, सायकलिस्टतर्फे जनजागृती

Nashik News : मेफेड्रॉन (एमडी), गांजा, भांग, गुटख्यासह अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात शहर पोलिस आयुक्तालयातर्फे शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मेफेड्रॉन (एमडी), गांजा, भांग, गुटख्यासह अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात शहर पोलिस आयुक्तालयातर्फे शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी सदरील सायकल रॅली बुधवारी (ता. २६) सकाळी काढण्यात आली. या निमित्ताने शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेतर्फे महाविद्यालयांमध्येही प्रबोधनात्मक वर्ग घेण्यात आले. (Anti Narcotics Cycle Rally)

जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधत पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेतर्फे बुधवारी (ता. २६) सकाळी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयापासून प्रारंभ झालेल्या या सायकल रॅलीमध्‌ये गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके.

सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांसह पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. या रॅलीत पोलिसांसह नाशिक सायकलिस्टचे सदस्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी ‘नशा कत्ल करता है...’, ‘अंमली पदार्थांचे सेवन टाळा’, ‘ड्रग्ज फ्री नाशिक’, ‘से नो टू ड्रग्ज’ या आशयाचे सामाजिक संदेश देणारे फलक झळकावत सदरची सायकल रॅली शहरातून काढण्यात आली.

रॅलीत नाशिक सायकलिस्ट व पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात घोषणा देत नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. रॅली पोलीस आयुक्तालयापासून प्रारंभ झाली. त्यानंतर, अशोक स्तंभ - रामवाडी - पेठ नाका- शरदचंद्र पवार मार्केट यार्ड- सिग्नल तारावाला नगर सिग्नल - दिंडोरी नाका - पंचवटी कारंजा- रविवार कारंजा --रेड क्रॉस सिग्नल- शालीमार -द्वारका -काठे गल्ली सिग्नल- सह्याद्री हॉस्पिटल- मुंबई नाका- गडकरी चौक- त्रंबक नाका -पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर समारोप झाला. (latest marathi news)

शिस्तबद्ध पद्धतीने जनजागृतीपर काढण्यात आलेली रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे ठरली. पोलीस मैदानावर रॅलीची सांगता झाल्यानंतर पोलीस बँडने अनोखे स्वागत केले. यावेळी शहर अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याची सामुहिक शपथ घेण्यात आली. याप्रसंगी सायकलिस्टच्या डॉ. मनीषा रौंदळ यांच्या समूहाने पथनाट्यही सादर केले. सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, विठ्ठल चव्हाण, अर्चना भड, देवकिसन गायकर, संजय ताजणे, गणेश भामरे यांनी रॅलीचे नियोजन केले होते.

महाविद्यालयांमध्ये जनजागृती

अंमली पदार्थांच्या व्यसनाला शाळा-महाविद्यालयांपासून सुरूवात होते. त्यामुळे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखेतर्फे शहरातील एचपीटी, केटीएचएम व बिटको महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, विशेष शाखेचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांनी संवाद साधला.

गुटखा, सिगारेटच्या सेवनासह अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच, शाळा-महाविद्यालयांसह समाजात अंमली पदार्थांची विक्री करणार्यांची माहिती देण्यासाठी पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असेही आवाहन उपायुक्त बच्छाव, सहायक निरीक्षक नागरे यांनी केले आहे.

"सिगारेट, गुटख्यासह अंमली पदार्थांच्या व्यसनापासून तरुणाईने लांब राहिले पाहिजे. त्याचा जसा आरोग्यावर परिणाम होतो तसाच समाजावरही विपरित परिणाम होत असतो. शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करणेही कायद्याने गुन्हा आहे." - संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT