नाशिकचे पक्षी मानचिन्ह
निवडताना लोकसहभाग हवा
निसर्गसेवक युवा मंचची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : नाशिक शहराचे अधिकृत पक्षी मानचिन्ह निवडण्याच्या सुरू असलेल्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि जास्तीत जास्त नाशिककरांचा सहभाग असावा, अशी मागणी निसर्गसेवक युवा मंचातर्फे करण्यात आली आहे. २५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ २,७०० ते २,८०० नागरिकांच्या मतदानावर शहराची पर्यावरणीय ओळख ठरवणे योग्य नसल्याचे मत मांडण्यात आले आहे.
सध्या नाशिकचे पक्षी मानचिन्ह निवडण्याचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचे स्वागत करतानाच निसर्गसेवक युवा मंचने प्रशासकीय सहभागावर बोट ठेवले आहे. या प्रक्रियेत प्रशासनाचाही सहभाग असल्याने हा विषय केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहराच्या नैसर्गिक ओळखीचा बनला आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. हा कोणत्याही संस्थेच्या उपक्रमाला किंवा विशिष्ट पक्ष्याला विरोध नसून, निर्णय नाशिकचा असेल तर त्यात संपूर्ण नाशिककरांचा सहभाग असावा, अशी भूमिका मंचाने मांडली आहे.
---कोट
२५ लाख लोकसंख्येच्या शहराचे प्रतीक ठरवताना केवळ काही हजार मतांवर समाधान न मानता, खऱ्या अर्थाने सर्व नाशिककरांना या प्रक्रियेत सामावून घ्यावे.
-अमित कुलकर्णी, पर्यावरणप्रेमी
---
प्रमुख मागण्या:
-शहरातील जास्तीत जास्त सामान्य नागरिकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांना मतदानाची संधी द्यावी.
-पक्षी निवडीसाठी दिलेले पर्याय अधिक व्यापक असावेत.
-मानचिन्ह निवडण्याचे नेमके निकष प्रशासनाने आणि आयोजकांनी जनतेसमोर स्पष्ट करावेत.
-या प्रक्रियेत शहरातील सर्व पक्षिमित्र, पक्षी अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि शैक्षणिक संस्थांची मते जाणून घ्यावीत.
-सर्वसमावेशक आणि पारदर्शक पद्धतीने अंतिम निर्णय जाहीर करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.