Nashik Brahmin Federation Front
Nashik Brahmin Federation Front  sakal
नाशिक

नाशिक : 'ब्राह्मण' महासंघातर्फे विराट मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी ब्राह्मण महासंघातर्फे नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात सर्वपक्षीय ब्राह्मण महासंघ सहभागी झाला होता. मोर्चेकऱ्यांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. मोर्चानंतर निवडक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ब्राह्मण समाजाबद्दल काढलेल्या कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मध्यंतरी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभेत अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाविरुद्ध वक्तव्य केले होते. या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन केले होते. सर्वपक्षीय ब्राम्हण नेत्यांनी एकजूट दाखवून यापुढे कोणीही ब्र शब्द काढल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा इशारा दिला.

मोर्चाचे नेतृत्व बाळासाहेब पाठक, आनंद दवे, भगरे गुरुजी, लक्ष्मण सावजी, धनंजय बेळे, ॲड. भानुदास शौचे, पराग शिंत्रे, ॲड. अविनाश भिडे आदींनी केले. या वेळी आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, उत्तमराव उगले आदींनीही हजेरी लावून मागणीला पाठिंबा दिला. दुपारी एक वाजता बीडी भालेकर मैदानावरून मोर्चाला सुरवात झाली.

मोर्चात सहभागी संस्था

मोर्चात अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था, शुक्ल संस्था, देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण संस्था, चित्तपावन ब्राह्मण संस्था, ब्राह्मण महासंघ, नाशिक रोड ब्राह्मण सभा, इंदिरानगर ब्राह्मण संस्था, नवीन नाशिक ब्राह्मण संस्था, सातपूर ब्राह्मण संघटना, गंगापूर रोड ब्राह्मण बंधू आणि भगिनी संस्था, पंचवटी ब्राह्मण बंधू आणि भगिनी संस्था, जुने नाशिक ब्राह्मण संस्था, अशोका मार्ग ब्राह्मण संस्था, गुजराथी ब्राह्मण संस्था, कान्यकुंज ब्राह्मण संस्था, हिंदी भाषिक ब्राह्मण संस्था, कराडे ब्राह्मण संस्था, कर्नाटकी ब्राह्मण संस्था, जगदंबा सेवा परिवार, परशुराम प्रतिष्ठान, नाशिक ब्राह्मण महिला संघ व संस्था, विश्वब्राह्मण नाशिक जिल्हा , वैदिक सनातन हिंदू धर्म सभा आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT