Nashik Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : ‘लाचलुचपत’च्या हाती लागेना संचालक तेजस गर्गे

Nashik Bribe : गेल्या आठवड्यात दीड लाखांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार झालेला पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचा संचालक तेजस मदन गर्गे अजूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या हाती लागलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : गेल्या आठवड्यात दीड लाखांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार झालेला पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचा संचालक तेजस मदन गर्गे अजूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या हाती लागलेला नाही. नाशिकच्या पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालिकेने लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यापासून गर्गे पसार झाला आहे. ( Director Tejas Garge not in hands of anti corruption bureau )

पेठरोडवरील रामशेज किल्ल्याच्या हद्दीत कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नाशिकच्या पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालिका आरती आळे यांनी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. सहाय्यक संचालिका यांनी घेतलेल्या लाचेत हिस्सा होता. मात्र, लाचखोर गर्गे ७ मेपासून फरार आहेत.

गर्गे यांचे मुंबई, पुणे व नाशिक निवासस्थानाबाहेर लाचलुचपतकडून नजर ठेवली आहे. तसेच, याप्रकरणी नातलग व मित्रांचीही चौकशी करण्यात आली असून, त्याचे ताडदेव (मुंबई) येथील घर पथकाने सील केले आहे. गर्गे यांच्या अटकेसाठी पथकांकडून तांत्रिक विश्लेषणानुसारही माग काढला जात आहे.

पुरातत्त्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालिका आरती आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर), विभागाचे संचालक तेजस मदन गर्गे (रा. मुंबई) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरती आळे या प्रसूती रजेवर असताना त्यांनी त्यांच्या निवासस्थानी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यानंतर गर्गे यांना फोन करून त्यांच्या हिस्स्याच्या रकमेबाबत त्यांचे बोलणेही झाले. गर्गे यांच्या अटकेनंतर आणखी खुलासा होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT