National Education Policy esakal
नाशिक

Nashik Educational News : बीएस्सी, बीकॉम अन्‌ बीए आता 4 वर्षांचे; शैक्षणिक धोरणानुसार बदल

Nashik News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रमाच्‍या रचनेत बदल होत आहे. त्‍यानुसार आता पारंपरिक पदवी अभ्यासक्रम तीनऐवजी चार वर्षे कालावधीचे असणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रमाच्‍या रचनेत बदल होत आहे. त्‍यानुसार आता पारंपरिक पदवी अभ्यासक्रम तीनऐवजी चार वर्षे कालावधीचे असणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून हा बदल लागू राहणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कला, वाणिज्‍य व विज्ञान महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांना यासंदर्भात माहिती कळविली आहे. (BSc, BCom and BA now 4 years)

सर्वसामान्‍य पालक व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील या बदलांविषयीची माहिती करून द्यावी, अशा सूचना परिपत्रकातून प्राचार्यांना देण्यात आल्‍या आहेत. परिपत्रकात नमूद केल्‍यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्‍नित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्याचे सूचित केले आहे.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. मंडळाच्‍या मान्‍यतेसह चार वर्षांचे पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व संलग्‍नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येत आहेत. याआधीच विविध व्‍यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षांचा आहे. आता पारंपरिक पदवी अभ्यासक्रमदेखील तीनऐवजी चार वर्षांसाठीचे असणार आहेत. (latest marathi news)

या विषयांतील अभ्यासक्रम असतील चार वर्षांचे

विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम (बीएस्सी) अंतर्गत भौतिकशास्‍त्र, मायक्रो बायोलॉजी, रसायनशास्‍त्र, जीवशास्‍त्र यांसह एकूण ३६ विशेष विषय असलेले अभ्यासक्रम चार वर्षांचे असतील. वाणिज्‍य शाखेतील (बी.कॉम.) बिझनेस ॲडमिनिस्‍ट्रेशन, अकाउंटन्‍सी ॲन्ड टॅक्‍सेशन, बिझनेस लॉ, कॉस्ट ॲन्ड मॅनेजमेंट अकाउंडटींग.

बिझनेस प्रॅक्‍टिसेस ॲन्ड को-ऑॅपरेशन, बँकिंग फायनान्‍स ॲन्ड इन्‍शुरन्‍स, मार्केटिंग यांसह मॅथेमॅटिक्‍स, स्‍टॅटिक्‍सटिक्‍स ॲन्ड कॉम्‍प्‍युटर ॲप्लि‍केशन ॲन्ड बिझनेस ॲनॅलेटिक्‍स असे आठ विषयांचे अभ्यासक्रम चार वर्षांचे असतील. कला शाखेत (बीए) मराठी, हिंदी, इंग्रजीसह मानसशास्‍त्र, इतिहास, राज्‍यशास्‍त्र असे एकूण सोळा विषयांचा पदवी अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT