नाशिक

Nashik Bus Accident: बसच्या खिडकीतून उडी मारत वाचवला जीव; प्रवाश्यांनी सांगितला थरारक अनुभव

अपघातात 12 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नाशिक येथे नांदूर नाक्याजवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण खासगी बसचा अपघात झाला. या अपघातानंतर खासगी बसने पेट घेतला ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बसच जळून खाक झाली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 21 प्रवाशी जखमी झाले आहेत तर 1 जण गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातात जीव वाचवणाऱ्या काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

पहाटे झोपेत असताना बस दुसऱ्या मोठ्या वाहनाला धडकली. काही समजण्यापूर्वीच बसला आग लागली. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारली. काही प्रवाशी झोपेत असल्यामुळे त्यांना लवकर उठता आले नाही. तर काही प्रवाश्यांनी आपल्या मुलांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना घेऊन खिडकीतून उड्या मारल्या. स्थानिक लोकांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. एक क्षण आम्ही मृत्यूच्या जवळ असल्याचं जाणवलं असंही प्रवाशी सांगतात. काही जण जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. किंकाळ्या फोडत होते. पण त्यांना बसमधून बाहेर पडता येत नव्हते.

स्थानिक लोकांनी जमेल तितक्या लोकांना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर काही लोक बसमधून बाहेर पडू न शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बसचा अपघात झाल्यानंतर बसच्या डिझेलच्या टाकीने पेट घेतला. त्यानंतर ही आग संपूर्ण बसला लागली. क्षणभरात संपूर्ण बस जळून खाक झाली.

प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला.

अपघाताची सखोल चौकशी व्हावी असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिले आहेत. जखमींना चांगल्यातले चांगले उपचार मिळावे यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घ्या, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघात ग्रस्तांना मदतीचीही घोषणा केली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना तातडीने चांगले उपचार दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT