An accident-prone car fell into the river after breaking the bridge on the Dugaon-Gangapur road near the Gangapur dam. esakal
नाशिक

Nashik Accident News : गंगापूर धरणाजवळ कथडा तोडून कार नदीपात्रात! अपघातात एक ठार; दोघे जखमी

Accident News : यात ३५ वर्षीय कारचालक जागीच ठार झाला तर, कारमधील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : दुगावकडून गंगापूर गावाकडे भरधाव वेगात आलेल्या कारचालकाच्या डोळ्यावर समोरून येणार्या वाहनाच्या दिव्यांमुळे नियंत्रण सुटले आणि कार पुलाचा कथडा तोडून नदीपात्रात पलटी झाली. यात ३५ वर्षीय कारचालक जागीच ठार झाला तर, कारमधील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (car fell into river after breaking wall near Gangapur Dam)

नितीन बापू कापडणीस (३५, रा चांदशी) असे मयत कारचालकाचे नाव आहे. तर, किरण संजय कदम (३२), योगेश पानसरे (३४, दोघे रा. चांदशी) असे जखमींची नावे आहेत. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नितीन कापडणीस हा त्याच्या कारमधून किरण व योगेश या दोघा मित्रांसमवेत दुगावकडून गंगापूर गावाच्या दिशेने येत होता.

दुगावकडून गंगापूरकडे येताना हॉटेल गंमत-जंमतच्या अलिकडे गोदावरी नदीवर पुल आहे. तसेच पुलाकडे येताना उतारही आहे. या उतारावरून कापडणीस यांची कार भरधाव वेगात येत असतानाच समोरून आलेल्या वाहनाचे दिवे कापडणीस याच्या डोळ्यावर आले.

त्यामुळे काही क्षणात कापडणीस यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार काही कळायच्या पुलाचा कथडा तोडून नदीपात्रामध्ये पलटी झाली. नदीला पाणी नसल्याने कार खडकावर जाऊन पलटी झाल्याने कापडणीस यांस गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर कारमधील दोघे किरण व योगेश हे जखमी झाले. (latest marathi news)

नाशिक तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी जखमींनी अपघाताची माहिती दिली. मयत कापडणीस यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

रॅश ड्रायव्हिंगची शक्यता

दुगावकडून गंगापूर गावाकडे येताना उतारावरून कार थेट पुलावरून कथडा तोडून नदी पात्रात कोसळली आहे. त्यावरून कार भरधाव वेगात असण्याचीच जास्त शक्यता आहे. भरधाव वेगामुळे कार पात्रात पलटी झाली असून, कारचा चक्काचूर झाला आहे. कार नियंत्रणात असती तर कथड्याला धडकून थांबली असती. परंतु ती वेगात पडल्याने चालकाच्या जीवावर बेतल्याची शक्यता व्यक्त होते आहे. तसेच, कारमधील मयत व जखमींनी मद्यपान केले होते का याचाही पोलीस तपास करीत आहेत.

"अपघाताची घटना कळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातप्रकरणी तपास सुरू आहे."

- सत्यजित आमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

SCROLL FOR NEXT