The trading complex is named after Shri Chhatrapati Shivaji Maharaj. Various Shiv lovers while giving a statement to the municipal authorities.
The trading complex is named after Shri Chhatrapati Shivaji Maharaj. Various Shiv lovers while giving a statement to the municipal authorities. esakal
नाशिक

Nashik News: रात्रीतून व्यापारी संकुलाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज नामकरण! येवला पालिकेकडून नामफलक हटविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

येवला : नाशिक- छत्रपती संभाजीनगर व नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या पालिकेच्या जागेवर नवीन व्यापारी संकुल उभे राहिले आहे. काही शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संकुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल’, असे नामकरण करून फलकही लावला आहे. हा फलक काढण्यावरून काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन पालिकेचे पथक माघारी फिरले, हा फलक कायम ठेवण्यासह अधिकृतपणे नामकरण करण्याची मागणी होत आहे. (Nashik Yeola Municipality marathi news)

नगरपालिका क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ३८०७ यावर व्यापारी संकुल २००८ पासून राजकीय गर्तेत अडकले आहे. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने संकुल पाडण्याचा आदेश केल्याने सुमारे शंभरवर गाळे पडून अनेकजण विस्थापित झाले. त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल झाले.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संकुलास श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असे नामकरण शिवप्रेमी जनतेने केले आहे. संकुलास नाव देण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय विभागाची परवानगी न घेतल्याने सकाळी पालिकेच्या पथकाने नामफलक हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवप्रेमी जनतेने पालिकेचा हा प्रयत्न हाणून पाडला.

जोरदार घोषणाबाजी करत शिवप्रेमींनी पालिका प्रशासनास निवेदन दिले. नगरपालिकेने शिवप्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेऊन जलद गतीने प्रक्रिया करत नवीन व्यापारी संकुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल असे नाव द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. नाव बदलण्याचा घाट पालिकेने तल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसतील, असा इशाराही दिला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते शाहू शिंदे, बाजार समितीचे संचालक सचिन आहेर, महेश काळे, प्रथमेश पगारे, अक्षय तांदळे, बापू लाड, संतोष जेजुरकर, निसार शेख, मनोज भदाणे, प्रतीक जाधव, नगरसेवक रुपेश लोणारी, कृष्णा लहरे, विकास घारू, कैलास गोसावी, अमोल दाणे, श्रीराम साळुंके, संदेश शिंदे, प्रतीक जाधव, वैभव लगड, अक्षय पाबळे, शुभम परदेशी, अमोल पाबळे, अनिल लाड, जालिंदर गाडे, गणेश जगताप, करण जाधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

"संकुलाला छत्रपती शिवरायांचे नाव देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेची असून, संकुलाच्या नामकरणाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता दिलेले नामकरण अधिकृत करून आमच्या भावनांची कदर करावी, अन्यथा जनआंदोलन उभारू."-शाहू शिंदे, युवा नेते, येवला

"शहर व तालुक्यातील जनतेच्या भावनांचा आदर करून व मागणीवरून रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व्यापारी संकुलाला दिल्याचे प्रथमदर्शनी दिसते. विस्थापित व बेरोजगार झालेल्या बांधवांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोचविण्याची भावना यात असावी, म्हणून तत्काळ गाळेवाटप होऊन संकुलाचे नाव कायम ठेवावे. जनतेच्या भावनांचा अनादर प्रशासनाने करू नये."-सचिन आहेर, संचालक, बाजार समिती, येवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT