child  esakal
नाशिक

Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

Nashik News : सिडकोतील मोरवाडीत असलेल्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून अवघ्या वर्षाचा चिमुरडा गॅलरीतून खाली बघताना तो पडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिडकोतील मोरवाडीत असलेल्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून अवघ्या वर्षाचा चिमुरडा गॅलरीतून खाली बघताना तो पडला असता पालकांच्या काळजाचा ठोकाच चुकला... मात्र देव तारी त्याला कोण मारी, या उक्तीप्रमाणे, तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुकला खाली पावसामुळे साचलेल्या पाण्याच्या तळ्यात पडल्याने बचावला. (child who fell from third floor was fortunately saved)

राजेश गुलाब गोसावी (वय १, रा. मोरवाडी) असे या चिमुरड्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी सिडको परिसरामध्ये वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

त्यावेळी तिसर्या मजल्यावर राहणार्या गोसावी यांचा एका वर्षाचा मुलगा खेळत-खेळत गॅलरीजवळ आला. बाहेर सुरू असलेला मुसळधार पाऊस पाहण्यासाठी त्याने गॅलरीतून डोकावले असता, त्याचा तोल गेला आणि तिसर्या मजल्यावरून खाली पडला. (latest marathi news)

त्याचवेळी जोरदार पावसामुळे खाली मोठ्याप्रमाणात पाणी साचलेले होते. त्याच पाण्यात राजेश पडला. तर, रस्त्यालगत आडोशाला थांबलेल्या नागरिकांनी लगेचच धाव घेत राजेशला पाण्यातून बाहेर काढले.

यात दूर्घटनेमध्ये चिमुकल्या राजेशच्या तोंडाला मार लागला आहे. मात्र तो बचावल्याचे पाहून राजेशच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. राजेश यास उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून २ दिवस रेड अलर्ट जारी; ४८ तास धोक्याचे

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

SCROLL FOR NEXT