clean city sakal
नाशिक

नाशिक : नागरिकांनो, स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रतिसाद नोंदवा

शहराच्या स्वच्छ प्रतिमेसाठी महापालिकेची धावाधाव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक नाशिक शहरात दाखल झाले आहे. दरम्यान, या सर्व्हेसाठी शहरातील नागरिकांनी आधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

केंद्र सरकारतर्फे दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा घेतली जाते. देशातील शहरे यात सहभागी होतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही निकष घालून दिले असून, त्या माध्यमातून याचे परीक्षण करून शहराला मानांकन दिले जाते. स्पर्धे तनाशिक महापालिका सहभागी झाली आहे.

या स्पर्धेचा भाग म्हणून नाशिक शहराचा पहिला क्रमांक मिळविण्यासाठी आधिकाधिक नागरिकांचे महिनाअखेरपर्यंत फिडबॅक घेतले जाणार आहेत. स्पर्धेसाठी केंद्राच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. त्यांच्यामार्फत ही पाहणी केली जाते. स्वच्छ सर्वेक्षणासाठी समितीतर्फे पाहणी सुरू झाली आहे. ही समिती सर्वेक्षण काळात कोणत्याही ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे.

गेल्या वर्षी नाशिक महापालिका देशात १७ व्या, तर राज्यात ५ व्या क्रमांकावर होती. यंदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी नागरिकांच्या प्रतिक्रिया व बांधकामाचे डेंब्रिज यामुळे नाशिक महापालिकेला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे यंदा नागरिकांच्या प्रतिसादासोबतच मागील वर्षीच्या त्रुटी दूर करून शहर सुशोभीकरणावर भर देण्यात आला आहे. या सर्व गोष्टींची पाहणी या पथकाद्वारे केली जाणार आहे.

३० पर्यंत फीडबॅक

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचे प्रतिसाद संकलित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.त शहरातील साधारण एक लाख नागरिकांचे फीडबॅक घेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने विविध प्रभागातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सरकारी व खासगी कार्यालये, मॉल, खासगी कंपनी आदी विविध क्षेत्रातील नागरिकांकडून फीडबॅक फॉर्म भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत https://ss-cf.sbmurban.org/#/feedback या संकेतस्थळावर प्रतिसाद फॉर्म भरून घेतले जाणार आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नाशिक शहराचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी आपले आपल्या शहराविषयीचे मत्त्वाचे फिडबॅक दिलेल्या लिंकचा वापर करून द्यावेत.

-रमेश पवार, आयुक्त, महापालिका, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT