Burnt grass in the river bed. In the second photo, water from a fire extinguisher is sprayed on a coconut tree to put out the fire. esakal
नाशिक

Nashik Fire Accident: वाळलेल्या गवताच्या पेटत्या तुऱ्यांनी नारळाच्या झाडाला आग! वावीजवळच्या फुलेनगरला थरकाप उडवणारी घटना

Fire Accident : फुलेनगर येथील साठवण बंधाऱ्याशेजारील नदीपात्रातील पानड गवताला शॉर्टसर्किटमुळे बुधवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

वावी : फुलेनगर येथील साठवण बंधाऱ्याशेजारील नदीपात्रातील पानड गवताला शॉर्टसर्किटमुळे बुधवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. गवताचे पेठ ते तुरे वाऱ्यासोबत उडून सुमारे २०० मीटर अंतरावरील नारळाच्या झाडावर जाऊन पडले. पेटलेल्या नारळाच्या झाडाची आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्यामुळे सिन्नर येथून अग्निशमन दलाचा बंब बोलावून आग विझवण्यात आली. (Nashik Coconut tree on fire near Vavi marathi news)

फुलेनगरच्या बंधाऱ्यालगत नदीपात्रात पानड गवत उन्हामुळे वाळले आहे. गवतावरून गेलेल्या वीजतारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडून आग लागली. जोराचा वारा वाहत असल्याने जवळपास ३०० ते ४०० फुटांच्या परिघात आग वेगाने पसरली.

बाभळीची झुडपे आगीने कवेत घेतली. पेटलेल्या गवताचे तुरे उडून वसंत पठाडे यांच्या शेतातील घरासमोरील नारळाच्या झाडावर जाऊन पडले. यामुळे नारळाच्या वाळलेल्या झावळ्यांनी पेट घेतला. दुसऱ्या नारळाचे झाडही पेटले. झाडाखाली पठाडे यांच्या गायी बांधल्या होत्या. गायी तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्या. (Latest Marathi News)

मात्र, नारळाच्या झाडावरच्या ठिणग्या पडून घराजवळ साठवलेला भुसा आगीत खाक झाला. यामुळे पठाडे यांचे १५ ते २० हजारांचे नुकसान झाले. नारळाच्या उंच झाडावर लागलेली आग विझवणे अशक्य असल्याने सिन्नर पालिकेचा अग्निशमन बंब बोलावण्यात आला. बंबाने काही मिनिटात दोन्ही झाडांवर लागलेली आग विझवली. नदीपात्रातील गवताला लागलेली आगही पाण्याचा फवारा मारून अग्निशमन बंबाने विझविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''ते' व्हिडीओ पुन्हा-पुन्हा बघण्यासाठी आरोपींचा अट्टहास'', धनंजय देशमुखांनी उघड केली धक्कादायक बाब

Mumbai Local: दारात लटकण्याची सवय मोडणार! मुंबई लोकलमध्ये सुरक्षेचा ‘धनुष्यबाण’; नवीन दरवाज्याची नेमकी रचना कशी असणार?

W,W,W,1,W,W ! वर्ल्ड रेकॉर्ड; T20I मध्ये एकाच षटकात घेतल्या पाच विकेट्स; भारतीय गोलंदाजाने SMAT मध्ये केला होता असा पराक्रम

Latest Marathi News Live Update : बाणेरमधील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय उघड; व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा

BOX OFFICE: 'धुरंदर' ७०० कोटी पार पण मराठी सिनेमांची परिस्थिती काय? किती आहे 'उत्तर' आणि 'आशा' सिनेमाची कमाई?

SCROLL FOR NEXT