Collector Jalaj Sharma esakal
नाशिक

Nashik News: सातबारा उताऱ्यावरील वारस नोंदी रखडल्या; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची तहसीलदार, प्रांत अधिकाऱ्यांविषयी नाराजी

Nashik : प्रलंबित नोंदीचे प्रमाण वाढत असल्याची नाराजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त करत आचारसंहितेपूर्वी महसूल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याची सूचना तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना दिली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातबारा उताऱ्यावरील वारसनोंदी,खरेदीच्या नोंदी, तक्रार नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या दैनंदिन कामांकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्यामुळे प्रलंबित नोंदीचे प्रमाण वाढत असल्याची नाराजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त करत आचारसंहितेपूर्वी महसूल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याची सूचना तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी शर्मा यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची बुधवारी (ता.१८) बैठक घेत महसूली कामांचा आढावा घेतला. (Collector Jalaj Sharma displeasure with tehsildar district officials heir records on Satbara Utara stopped )

या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी जमीन महसूल व गौण खनिज आढावा घेताना गत वर्षाच्या तुलनेत यंदा महसूल वसुली १० टक्के कमी झाली असल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेचा कालावधी लक्षात घेता आजच महसूल वसुलीकडे लक्ष देत दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ३१ ऑगस्ट अखेर अवघी ३४ टक्के महसूल वसुली असून निफाड सारख्या तालुक्यात ती अवघी १० टक्केच झाली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांची वसुली कमी आहे. त्या तालुक्यांच्या तहसिलदारांनी महसूल वसुलीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शर्मा यांनी सांगितले. (latest marathi news)

५४ विषयांचा धावता आढावा

ई-चावडी,डिजिटल क्रॉप सर्वे पीक पाहणी, नोंदणीकृत अनोंदणीकृत विवादग्रस्त व अविवादग्रस्त फेरफार नोंदी, ई-हक्क प्रणाली, सेवा हमी कायद्या अंतर्गत नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवांची सद्यःस्थिती, राज्य सेवा हमी आयोगाकडील अपिले, तलाठी कार्यालय इमारत बांधकाम आढावा, विधानसभा निवडणूक पूर्व तयारी व मतदार यादी, अखर्चित निधी, अपूर्ण कामे, आधार सीडिंग, जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले खाणपट्टे व वाळू डेपो या ठिकाणी बसवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, शासकीय जमिनीवरील खाणपट्टे, पोटखराबा वर्ग जमिनीचे क्षेत्र लागवड, आस्थापनाविषयक बाबी आणि क व ड संवर्गातील कर्मचारी यांचे विभागीय चौकशीबाबत अशा जवळपास ५४ विषयांचा धावता आढावा जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT