mucormycosis e sakal
नाशिक

नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी महापालिकेचा बाह्यरुग्ण विभाग

विक्रांत मते


नाशिक :
कोरोना रुग्णांच्या उपचारानंतर आता म्युकरमायकोसिस (mucormycosis) आजाराने तोंड वर काढल्याने अशा महागड्या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


फेब्रुवारी ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात फैलावणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जून महिन्यात झपाट्याने आटोक्यात आली आहे. परंतू कोरोना रुग्णांवरील उपचारानंतर काही रुग्णांना म्युकरमायकोसिस आजार बळावला असून या आजारावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. सर्वसामान्यांना परवडणारा हा आजार नाही. त्यामुळे अशा रुग्णांसाठी महापालिकेच्या वतीने पोस्ट कोविड बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे.

पालिकेच्या दवाखान्यांमध्ये देखील तपासणीची सोय करण्यात आली आहे. कोरोना उपचारानंतर काही त्रास असल्यास नागरीकांनी तेथे तपासणी करून घेण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे. पुर्व विभागात डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नाशिकरोड विभागात जेडीसी बिटको रुग्णालय, पंचवटी विभागात इंदिरा गांधी रुग्णालय, सिडको विभागात श्री स्वामी समर्थ रुग्णालय, सातपूर विभागात गंगापूर रुग्णालय, पश्‍चिम विभागात मेनरोड वरील जिजामाता रुग्णालयात उपचाराची सुविधा करण्यात आली आहे.


(Nashik Corporation started outpatient departments in hospitals for mucormycosis patients)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT