Burglary Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : उपनगरांमध्ये तीन घरफोड्यात 10 लाखांचा ऐवज चोरीला! शहरात घरफोड्यांचे सत्र; गल्ल्यातून साडेसात लाख चोरीला

Latest Crime News : पहिली घरफोडी अशोकनगर येथे दुसरी घरफोडी नाशिकरोड हद्दीतील शिंदेगाव येथे झाली आणि तिसरी घरफोडी सिडकोतील वृंदावन चौकात झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : अशोकनगर येथील टेक्सस्टाईलच्या दुकानाच्या गल्ल्यातून साडेसात लाखांची रोकड, नाशिकरोडला बंद घराचा कडीकोयंडा तोडून सव्वा दोन लाख तर सिडकोतील घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ३४ हजार असा तीन घरफोड्यांमध्ये सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सातपूर, अंबड व नाशिकरोड पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. (10 lakhs stolen in three house burglaries)

आशिष जगदीश भट्टड (रा. चंद्रलीला बंगला, सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे अशोकनगर येथे प्रगती टेक्सस्टाईल्स मार्केट हे कपड्याचे दुकान आहे. रविवारी (ता. २९) पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील खिडकीतून आत प्रवेश केला आणि त्याने गल्ल्याच्या ड्राव्हरमध्ये घरपट्टी भरण्यासाठी ठेवलेले ७ लाख ५० हजारांची रोकड चोरून नेली.

याप्रकरणी सातपूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक रोहीत गांगुर्डे हे तपास करीत आहेत. तर दुसरी घरफोडी नाशिकरोड हद्दीतील शिंदेगाव येथे झाली. रवी संतू पाळदे (रा. शिंदेगाव) यांच्या फिर्यदीनुसार, शनिवारी (ता. २८) सकाळी साडेआठ ते रात्री दहा यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी पाळदे यांच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. (latest marathi news)

चोरट्यांनी घरातून २ लाख २२ हजारांच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घरफोडी, सिडकोतील वृंदावन चौकातील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

स्नेहल महेश सोनजे (रा. वृंदावन चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, २० तारखेला मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सदरची घरफोडी केली. यात चोरट्यांनी ३४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT