Paramveersingh Bedi esakal
नाशिक

Nashik Crime : रोटरमध्ये अडकून तेरा वर्षीय बालकाचा करुण अंत! चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील घटना; चालकावर गुन्हा दाखल

Nashik News : याबाबत चांदवड पोलिसांत ट्रॅक्टर चालकावर मोटर वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणूर : शेतमशागतीसाठी वापरात येणाऱ्या ट्रॅक्टर रोटरमध्ये अडकून बालकाचा करूण अंत झाल्याची घटना आज (ता. १७) सोमवार रोजी दुपारी घडली. याबाबत चांदवड पोलिसांत ट्रॅक्टर चालकावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik 13 year old boy got stuck in rotor die)

मंगरूळ ता. चांदवड येथील गुरुद्वारा परिसरात धाकराव वस्तीजवळ असलेल्या शेतात शेतमशागतीचे काम सुरू होते. यावेळी परमवीरसिंग हरमितसिंग बेदी हा तेरा वर्षीय बालक आपल्या कुटुंबीयांसोबत शेतातील कचरा वेचण्याचे काम करत होता. त्याच वेळी ट्रॅक्टर चालक मलकितसिंग बेदी हे ट्रॅक्टर रिव्हस घेत असताना परमवीरसिंग हा बालक रोटरमध्ये अडकला व काही क्षणांत कंबरेपर्यंत रोटर मशीन मध्ये ओढला गेला.

त्याला तत्काळ मशीन मधून काढत चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र पायाच्या बाजूने कंबरेपर्यंतचा भाग रोटर मध्ये फिरला गेल्याने अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या परमवीरसिंग या बालकाला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अमरजीतसिंग कुलदीप सिंग बेदी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक आरोपी मलकितसिंग कुलदीपसिंग बेदी याच्यावर मोटर वाहन कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

नुकताच पाऊस झाल्याने सर्वत्र शेतमशागतीचे कामांनी वेग घेतला असताना तालुक्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस हवालदार मन्साराम बागुल करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच मंगरूळ, चांदवड परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. रात्री उशिरा पर्यंत पुढील कारवाई सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

SCROLL FOR NEXT