Burglar caught on CCTV esakal
नाशिक

Nashik Robbery News : नांदूर शिंगोट्यात एकाच रात्री 4 दुकाने फोडली! सुदैवाने 2 दुकानांची चोरी फसली

Nashik News : नांदुर-शिंगोटे परिसरामध्ये चोरीच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी रात्री तीन दरम्यान भर बाजारपेठेमध्ये तीन सोनारांची दुकाने फोडली.

प्रकाश शेळके

Nashik News : नांदुर-शिंगोटे परिसरामध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी डिझेल चोरीच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी रात्री तीन दरम्यान भर बाजारपेठेमध्ये तीन सोनारांची दुकाने लक्ष बनविली. मात्र सुदैवाने त्यातील दोन दुकानांचीच शटर तोडण्यास चोरटे यशस्वी झाले तर एका दुकानाचे शटर तोडून किरकोळ मुद्देमाल लंपास तर एक किराणा दुकान फोडून सहा ते सात हजार रुपये रोख रक्कम चोरली. (4 shops were broken in one night in Nandur Shingote)

सविस्तर वृत्त असे की नांदुर-शिंगोटे येथील ग्रामपंचायत व्यापारी संकुलामध्ये सोन्याची दुकाने असून या ठिकाणी अंबिका ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न सीसीटीव्ही झाला. अंबिका ज्वेलर्सचे संचालक सुबोध माळवे यांचे दुकान फोडण्यात चोरटे यशस्वी झाले तर त्याला लागूनच असलेले साई ज्वेलर्स जितेश माळवे यांच्या दुकानाचे शटर तोडण्यात चोरटे अयशस्वी झाल्याचे प्रत्यक्ष सीसीटीव्ही मध्ये कैद झाले.

असून सदरच्या सीसीटीव्ही मध्ये तीन चोरटे दिसत असून यामध्ये एकाच्या हातामध्ये काहीतरी गोणी दुसऱ्याच्या हातात कटावणी इतर तिसऱ्याच्या हातामध्ये गलोवर दिसून आली. या ठिकाणी चोरटे यशस्वी झाल्यानंतर नजदीकच असलेल्या ए. बी. ज्वेलर्स बाळासाहेब माळवे यांच्या दुकानाचे शटर तोडण्यात चोटे यशस्वी झाले. मात्र या दुकानात किरकोळ वस्तू वगळता काही त्यांच्या हाती लागले नाही.

तर त्यानंतर त्यांनी मारुती मंदिरालगत असलेल्या दिलीप पठारे यांच्या दर्शन किराणा दुकानाचे शटर कटावणीने तोडून दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेण्यात ते यशस्वी झाले. साधारणता रात्री तीन वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. (latest marathi news)

दर्शन किराणाचे मालक दिलीप पठारे यांचे बंधू अनिल पठारे हे नजदीकच राहत असून ते मुंबई येथे सकाळी जाणार असल्याकारणाने लवकर उठले असताना ते बाहेर आले तर दुकानाच्या ओट्यावर तीन चोरटे गप्पा मारताना त्यांना आढळून आले. त्यांची येण्याची चाहूल लागताच तिघांनी बॉक्सर मोटरसायकल वरून पलायन केल्याचे निदर्शनास आले.

नांदूर शिंगोटे मध्ये एकाच रात्रीत चार ते पाच चोरी सत्रामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांना खबर देण्यात आले असून श्रीसर पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. नांदुर-शिंगोटे येथे पुन्हा चोरी सत्राला सुरुवात झाली असून रात्रीच्या वेळीस पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT