Crime News
Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : अट्टल घरफोड्याला आडगाव पोलिसांनी केले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : आडगाव नाका येथील क्लासच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल घरफोड्याला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम अशोक खलसे (रा. शिवमुद्रा चौक, इच्छामणी नगर, आडगाव शिवार) असे अटक करण्यात आलेल्या संशयित घरफोड्याचे नाव आहे. (Nashik Crime Adgaon police arrested house burglar marathi news)

विलास दिलीप महाजन (रा. श्रीराम नगर, आडगाव शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १०) आडगाव नाका येथे असलेल्या त्यांच्या क्लासच्या कार्यालयातून ३० हजारांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे.

आडगाव पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने तपास करीत असताना अंमलदार दादासाहेब वाघ यांना संशयित खलसेची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने वृंदावननगर परिसरात सापळा रचला आणि संशयित खलसे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  (latest marathi news)

त्याच्याकडून ३० हजारांचा चोरीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक प्रवीण दाईगडे, मयुर विक्रम, सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, निलेश काटकर, दादासाहेब वाघ यांच्या पथकाने बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: "हाती आलेले निकाल हे..." बारामतीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Bajarang Sonawane: "जरांगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामाला आला"; विजयाचा गुलाल उधळल्यानंतर बजरंग सोनावणेंनी व्यक्त केल्या भावना

Lok Sabha Election Result 2024 : सर्व्हे चुकीचा ठरतोय दिसताच अॅक्सिस माय इंडियाच्या प्रमुखाला कोसळलं रडू

Beed Constituency Lok Sabha Election Result: बीडमध्ये फिरली बजरंगाची गदा! पंकजा मुडेंचा चुरशीच्या लढतीत पराभव

Odisha Assembly Election : भाजपचा २५ वर्षांपासून एकतर्फी सत्ता गाजवणाऱ्या BJDला धोबीपछाड! ८० जागा जिंकत मिळवलं स्पष्ट बहुमत

SCROLL FOR NEXT