Sangli Crime : सांगली संस्थानच्या गणेश मंदिरासमोरच तरुणाचा कोयता, चाकूने भोसकून निर्घृण खून; घटनेने उडाली खळबळ

पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
Sangli Crime News
Sangli Crime Newsesakal
Summary

जीवाच्या आकांताने राहुल मंदिरासमोर असणाऱ्या नारळ विक्रेत्याच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तेथेच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.

सांगली : गजबजलेल्या संस्थानच्या गणेश मंदिराच्या (Ganesha Temple) दारात तरुणाचा कोयता, चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. राहुल संजय साळुंखे (वय १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात साळुंखे याचा मित्र तेजस प्रकाश कारंडे (२१, रा. जामवाडी) गंभीर जखमी आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू आहेत.

काल रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. दर्शनासाठी मोठी गर्दी असता झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी तत्काळ पथके रवाना केली आहेत.

घटनास्थळ व पोलिसांकडून (Police) मिळालेली माहिती अशी, आज स्वामी समर्थ प्रकट दिनामुळे मंदिर परिसरात गर्दी होती. मागील बाजूला दर्शनानंतर गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती. मृत राहुल साळुंखे आणि त्याचा मित्र तेजस कारंडे दुचाकी (एमएच ०२ ए ८३०८) वरून गणपती मंदिराजवळ आले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी दुचाकी लावली. त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या दोघांनी क्षणात राहुल याच्या पोटात एकापाठोपाठ एक चाकू आणि कोयत्याने भोसकले.

Sangli Crime News
'अजून वेळ गेलेली नाही, सांगलीच्या उमेदवारीचा पुनर्विचार करा'; विश्‍वजित कदमांचे 'मविआ'च्या नेत्यांना आवाहन

त्यावेळी त्याला वाचविण्यास आलेल्या तेजस कारंडेच्या डोक्यावरही हल्लेखोरांनी वार केला. जीवाच्या आकांताने राहुल मंदिरासमोर असणाऱ्या नारळ विक्रेत्याच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तेथेच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर हल्लेखोरांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने चौकात गोंधळ उडाला होता. त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली.

शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला पूर्वीच्या वादातूनच झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक संशयिताच्या शोधासाठी तत्काळ रवाना झाले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्‍वान परिसरातच घुटमळले.

Sangli Crime News
'दोन्ही राजे समोर असले, तरी साताऱ्याची जनता माझ्यासोबतच'; पवारांनी टाकला विश्वास अन् शिंदेंनी दिलं खुलं आव्हान

मृतावर खुनी हल्ल्याचा गुन्हा

१८ जानेवारीला कोयत्याचा धाक दाखवून सांगली-कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे भरदुपारी अपहरण केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये मुलीच्या आईवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता. त्याचा गुन्हा मृत राहुल साळुंखे याच्यावर होता, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

Sangli Crime News
'सतेज' पाठिंबा अन् महाडिकांना मिळालं दहा हत्तीचं बळ; पवारांची मनधरणी आणि मुश्रीफांची मध्यस्थी ठरली निर्णायक!

पोटात वर्मी वार

संशयितांनी राहुल याच्या पोटात एकच वार केला. तो इतका वर्मी होता, की त्यात अतिरक्तस्त्रावाने राहुल याचा जागीच मृत्यू झाला. मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com