Extortion Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : बारमालकाला खंडणीसाठी धमकावले; सराईत गुन्हेगाराला अंबड पोलिसांकडून अटक

Crime News : खंडणी न दिल्यास चॉपरने हातपाय कापून टाकण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिडकोत भाईगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने थेट बार मालकालाच दरमहा पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले आहे. खंडणी न दिल्यास चॉपरने हातपाय कापून टाकण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. (Nashik Crime Bar owner threatened for extortion)

गणेश कुऱ्हे (रा. सिडको, नाशिक) असे खंडणीसाठी धमकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अनिल पाटील (रा. वासननगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, पाटील यांच्या मालकीचे सिडकोतील उत्तमनगर येथे हॉटेल पूनम बार आहे. संशयित गणेश कुऱ्हे हा सिडको परिसरात भाईगिरी करतो.

त्याच्यावर विविध स्वरुपाचे गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, कुऱ्हे याने शनिवारी (ता. १३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास बार मालक पाटील यांच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि ‘पूनम बार चालू ठेवायचे असेल तर, दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. (latest marathi news)

संध्याकाळपर्यंत पाच हजार रुपये नाही आले तर चॉपरने तुझे हातपाय तोडतो’ अशी धमकीही दिली. त्यानंतरही त्याने वारंवार संपर्क साधत धमकावले. त्यामुळे पाटील यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संशयित कुऱ्हे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुऱ्हेची अटक अन्‌ सुटका

गुन्हा दाखल होताच अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने संशयित कुऱ्हेचा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे संशयिताचा माग काढत त्यास अटक केली. पोलीस चौकशीत कुऱ्हे याने गुन्ह्याची कबूली दिली. संशयिताला अटक केली, परंतु गुन्हा जामीनपात्र असल्याने त्याची कायदेशीर प्रक्रिया करून सुटका करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Mass Copy : बारावी निकालादरम्यान मोठी खळबळ! 250 हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई; गोंदिया-वर्ध्यातील 243 विद्यार्थी अनुत्तीर्ण, बोर्डाचा कठोर निर्णय

डॉक्टर 'डिलिव्हरी जिहाद' करतात, हिंदू महिलांचं सिझेरियन कसं? कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान

शिवकालिन इतिसाहातील एक सुवर्ण पान! भव्य सेट, दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन सीन; कसा आहे 'राजा शिवाजी'?

Crime: धक्कादायक! ८ मुलांची आई ५ मुलं असलेल्या जावयासोबत पळाली, पती म्हणतो- १२ वर्षाआधी पण त्यांनी...

अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे आवाहन; तज्ज्ञांचा नागरिकांना सावधगिरीचा इशारा

SCROLL FOR NEXT