Bus Depot crimes
Bus Depot crimes esakal
नाशिक

Nashik Crime: बसस्थानकांचे आगार नव्हे चोरट्यांचे अड्डे! 2 महिन्यात प्रवाशांचे 21 लाखांचा ऐवज लंपास; पोलिसांना खुले आव्हान

नरेश हाळणोर

नाशिक : शहरात असलेले जुने बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानक हे जणू काही चोरट्यांचे अड्डेच बनले असून, भरदिवसा प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारला जातो आहे. तर, पोलिसात केवळ गुन्हे दाखल केले जातात मात्र, अद्यापपर्यंत एकाही गुन्ह्याची उकल पोलिसांना करता आलेली नाही.

त्यामुळे पोलीसांचे चोरट्यांशी संगनमत तर नाही ना, अशी साशंकता प्रवाशांकडून व्यक्त होते आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांमध्ये या तीनही बसस्थानकावर सक्रिय असलेल्या चोरट्यांनी प्रवाशांचे तब्बल २० लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. (Nashik Crime Bus stations thieves increased marathi news)

शहरात राज्य परिवहन महामंडळाचे जुने मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस), ठक्कर बाजार बसस्थानक आणि महामार्ग बसस्थानक असे तीन मुख्य बसस्थानक आहेत. या तीनही बसस्थानकांमध्ये प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत याठिकाणी चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील दागिने, बॅगेत ठेवलेल्या पर्समधील दागिने, पुरुषांच्या गळ्यातील दागिने असा ऐवज सर्रासपणे लंपास केला जातो.

तक्रारदारांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. परंतु अद्यापपर्यंत एकाही गुन्ह्याची उकल पोलिसांना करता आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयीची शंका आहे.

सरकारवाडा पोलिसात नुकतेच दोन गुन्हे दाखल झाले असून, नंदा चौघुले (रा. ध्रुवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या २७ फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता ठक्कर बाजार स्थानकात आल्या असता, गर्दीच्या फायदा घेत चोरट्याने त्यांच्याकडील १ लाख रुपयांची रोकड लंपास केली. तर वंदना देवरे (रा. ता. साक्री, जि. धुळे) यांच्या कडील ९ हजार रुपयांचे दागिने चोरट्याने सोमवारी (ता.४) जुने सीबीएस येथे चोरले आहेत. याप्रकरणी नेहमीप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.

सर्वाधिक चोऱ्या सीबीएसमध्ये

जुने मध्यवर्ती बसस्थानकामध्ये गेल्या दोन महिन्यात प्रवाशांचा ऐवज चोरीचे १० गुन्हे सरकारवाडा पोलिसात दाखल असून, यात ८ लाख ५ हजार १०० रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. तर, ठक्कर बाजार बसस्थानकातून २ लाख ५६ हजार ९०४ रुपयांचा प्रवाशांचा ऐवज चोरीला गेला असून, तीन गुन्हे दाखल आहेत. (Latest Marathi News)

मुंबई नाका पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर

महामार्ग बसस्थानक हे मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर आहे. तरीही याठिकाणी सातत्याने चोरट्यांकडून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारला जातो. गेल्या दोन महिन्यात येथे पाच गुन्ह्यांमध्ये तब्बल १० लाख १८ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.

महिला चोरट्यांची टोळी

या तीनही बसस्थानकांच्या आवारात महिला, अल्पवयीन मुलींच्या टोळ्या सक्रिय आहेत. मराठवाड्यातील या टोळ्या असून, गस्तीवर असलेल्या पोलिसांना या टोळ्यांची माहिती असल्याचे बसस्थानकांतील अधिकारी-कर्मचारीच बोलतात.

त्यामुळे पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. काही महिन्यांपूर्वी चाणाक्ष प्रवाशाच्या तत्परतेमुळे पोलिसांच्या हाती महिलांची एक टोळी लागली होती. त्यात दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश होता. परंतु त्यानंतरही चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत, हे विशेष.

* बसस्थानक ....... चोरीला गेलेला ऐवज ........ गुन्हे

- ठक्कर बाजार बसस्थानक .... २ लाख ७६ हजार ९०४ रुपये .... ४

- सीबीएस ....... ६ लाख ८५ हजार १०० रुपये.... १०

- महामार्ग बसस्थानक ..... १० लाख १८ हजार रुपये .... ५

- चोरीला गेलेले दागिने : १७ लाख ७० हजार ४ रु.

- रोकड : १ लाख ८० हजार रुपये

- इतर (लॅपटॉप, मोबाईल) : ९० हजार

"बसस्थानक परिसरात सातत्याने गस्तीपथकामार्फत गस्त केली जाते. काही दिवसांपूर्वी महिलांची टोळीही जेरबंद केली होती. पुन्हा विशेष पथकामार्फत कारवाई केली जाईल. जेणेकरून बसस्थानक परिसरातील चोरीच्या गुन्ह्याचा आळा बसू शकेल."

- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT